- जर्मनीतील म्युनिच येथे झालेल्या नेमबाजी वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकण्यात सरबजोतसिंग यशस्वी ठरला.
- त्याने 6 जून रोजी दहा मीटर एअर पिस्तूल प्रकारात ही कामगिरी केली.
- अंतिम फेरीत चीनच्या बू शुआई बू शुआईहांग याला2 गुणांनी मागे टाकले.
- प्राथमिक फेरीत सरबजोतने 588 गुणांसह अव्वल क्रमांक मिळवला होता.
- अंतिम फेरीत विविध देशांच्या आठ नेमबाजांचा समावेश होता.
- चीनच्या शुएहँगने रौप्यपदक तर जर्मनीच्या रॉबिन वॉल्टरने कांस्यपदक पटकाविले.
- जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिम्पिकसाठी ही पात्रतेची नेमबाजी स्पर्धा म्हणून ओळखली जाते.
- सरबजोतने वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक जिंकले.
- यापूर्वी त्याने मागील वर्षीच्या भोपाळ स्पर्धेत ही कामगिरी केली होती