- थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक एकवर असून ही गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र 2022-2023 मध्ये क्रमांक एकवर होता.
- आता 2023-2024 या आर्थिक वर्षातसुद्धा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
- केंद्र सरकारच्या औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने ही आकडेवारी जाहीर केली.
- या आकडेवारीनुसार, महाराष्ट्राने गेल्यावर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी खेचली आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षांत 1 लाख 18 हजार 422 कोटी अशी गुंतवणूक राज्यात आली होती.
- 2023-2024 या आर्थिक वर्षांत 1 लाख 25 हजार 101 कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रात आले आहेत.
- या आर्थिक वर्षातील गुंतवणूक ही गुजरातमध्ये प्राप्त झालेल्या एकूण गुंतवणुकीपेक्षा दुपटीहून अधिक आहे, तर दुसऱ्या क्रमांकावरील गुजरात आणि तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटकच्या एकूण बेरजेपेक्षाही अधिक आहे.
थेट परकी गुंतवणूक झालेली राज्ये (2023-2024)
(गुंतवणूक कोटी रुपयांमध्ये)
1) महाराष्ट्र – 1,25,101
2) गुजरात – 60,600
3) कर्नाटक – 54,427
4) दिल्ली- 53,980
5) तामिळनाडू – 20,157