- चीनच्या वाढत्या वर्चस्वाच्या पार्श्वभूमीवर जपान आणि फिलिपिन्स या देशांमध्ये महत्त्वाचा संरक्षण करार झाला आहे.
- यामुळे फिलिपिन्समध्ये होणाऱ्या लष्करी सरावात जपान सहभागी होऊ शकणार आहे, जेणेकरून या भागात जपानी सैन्याचा वावर वाढणार आहे.
- दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी सैन्याने फिलिपिन्सवर ताबा मिळविला होता. त्यामुळे अनेक वर्षे या दोन देशांमध्ये कटुता होती. मात्र, चीन या दोघांना आव्हानात्मक ठरणाऱ्या देशाचे बळ वेगाने वाढत असल्याने या दोन देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे.