- महाराष्ट्रातील पुणे शहरात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत.
- 9 जुलै 2024 पर्यंत पुणे शहरात 15 रुग्णांची नोंद करण्यात आली होती
झिका व्हायरस म्हणजे काय?
- झिका व्हायरस रोग किंवा झिका ताप हा मुख्यतः संक्रमित एडीस इजिप्ती (मादी)प्रजातीच्या डासांच्या चावण्याने होतो .
- एडिस डास प्रामुख्याने दिवसा चावतात, विशेषत: पहाटे आणि दुपार/संध्याकाळच्या वेळी.
गर्भवती महिलांना अधिक धोका…
- एखाद्या गर्भवती महिलेला संक्रमित डासाने चावा घेतल्यास झिका विषाणू प्लेसेंटामध्ये प्रवेश करू शकतो आणि गर्भावर परिणाम करू शकतो.
- झिका विषाणूचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो, परंतु गर्भवती महिलांना गर्भपात होण्याची शक्यता अधिक असते आणि गर्भाच्या मायक्रोसेफली आणि इतर न्यूरोलॉजिक विकृती यांसारख्या जन्मजात विकृतींचा परिणाम झिका विषाणूच्या बाळामध्ये होतो.
- झिका आजारावर कोणतीही लस किंवा औषध नाही.
- लक्षणे : ताप, पुरळ, डोकेदुखी ,सांधेदुखी, डोळे लाल होणे ,स्नायूदुखी
- झीकावर निश्चित उपचार नसल्याने रुग्णाला दिसणाऱ्या लक्षणांवर औषधे दिली जातात भरपूर पाणी पिणे पुरेशी विश्रांती आणि सात्विक आहार यातून रुग्ण बरा होऊ शकतो.
- झिका विषाणू रोग हा स्पॉन्डवेनी गटातील फ्लॅविव्हायरस वंशातील फ्लॅविविरिडे कुटुंबातील विषाणूमुळे होतो.
- हे प्रथम 1947 मध्ये युगांडाच्या झिका जंगलातील माकडापासून वेगळे केले गेले होते, त्यानंतर 1948 मध्ये त्याच जंगलातील डासांमध्ये (एडीस आफ्रिकनस) आणि 1952 मध्ये नायजेरियातील एका माणसामध्ये लक्षणे दिसून आली.