- इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन निवृत्त होताना इंग्लंड मधील लॉर्ड्स मैदानावर वेस्ट इंडिजच्या संघाविरुद्ध त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला.
- इंग्लंडने वेस्ट इंडीजवर एक डाव व 114 धावांनी मात केली.
- जेम्स अँडरसनला विजयाने निरोप देण्यात आला.
- कसोटी क्रिकेटमध्ये त्याने एकूण 704 विकेट मिळवल्या.
- अखेरच्या कसोटीत त्याने चार फलंदाज बाद केले.
- जोशुआ डी सिल्वा ही 41 वर्षीय अँडरसनची कसोटी कारकिर्दीतील अखेरची विकेट ठरली.
- अँडरसनने कसोटीत मायदेशात 438 विकेट घेतल्या.
- त्याने मायदेशाबाहेर कसोटीत 266 विकेट घेतल्या.
- अँडरसन 188 कसोटी सामने खेळला.
- तो सचिन तेंडुलकरनंतर (200 कसोटी) सर्वाधिक कसोटी सामने खेळणारा क्रिकेटपटू ठरला.
- अँडरसनने लॉर्ड्स येथे सर्वाधिक 123 विकेट मिळवले.
- एका मैदानात मुरलीधरन याने सर्वाधिक 166 विकेट मिळवल्या आहेत. त्याने कोलंबो येथे ही किमया केली.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणारे गोलंदाज
1) 800 विकेट : मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)
2) 708 विकेट : शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
3) 704 विकेट : जिमी अँडरसन (इंग्लंड)
4) 619 विकेट : अनिल कुंबळे (भारत)
5) 604 विकेट : स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड)