- उत्तराखंड मधील पिठोरागड येथील मुनसियारी गावात 35 प्रजातींच्या फुलांचे देशातील पहिले ‘रोडोडेंड्रॉन उद्यान’ विकसित करण्यात आले.
- ‘रोडोडेंड्रॉन आर्बोरियम’ असे याचे नाव असून, ही वनस्पती जगभरात सर्वत्र प्रसिद्ध आहे.
- या 35 प्रजातींपैकी पाच प्रजाती केवळ उत्तराखंडमध्ये सापडतात.
- ‘या वनस्पतीबाबतच्या पुढील वैज्ञानिक संशोधनासाठी प्रजातींचे जतन करण्याच्या उद्देशाने; तसेच नागरिकांमध्ये रोडोडेंड्रॉनचे पर्यावरणीय आणि आर्थिक महत्त्व रुजवण्याच्या उद्देशाने उत्तराखंड वन विभागाच्या संशोधन शाखेने या उद्यानाची उभारणी केली आहे.
‘रोडोडेंड्रॉन’ वनस्पतीचे महत्त्व…
- उत्तराखंडचा राज्य वृक्ष
- नागालँडचे राज्य फूल
- नेपाळचा राष्ट्रीय वृक्ष
रोडोडेंड्रॉन‘चे वैशिष्ट्य काय?
- हिमालयीन परिसंस्थेमध्ये रोडोडेंड्रॉन एक प्रमुख प्रजाती म्हणून काम करते.
- ही वनस्पती पूर्ण बहरात असताना मनमोहक रंगाची फुले येतात. त्यामुळे या फुलांकडे पक्षी आणि कीटक मोठ्या संख्येने आकर्षित होतात.
- रोडोडेंड्रॉनच्या फुलामध्ये अँटी ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात.