- भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने 35 व्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये दमदार यश मिळवले.
- एका विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले, तर तीन विद्यार्थ्यांनी रौप्यपदकाची कमाई केली.
- पदकविजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- कझाकिस्तानमध्ये अस्ताना येथे 7 ते 13 जुलै या कालावधीत ही स्पर्धा झाली.
- मुंबईच्या वेदान्त साकरे या विद्यार्थ्याने सुवर्णपदक पटकाविले, तर रत्नागिरीचा ईशान पेडणेकर, चेन्नईचा श्रीजित सीवाकुमार, बरेलीचा यशस्वी कुमार या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळवले.
- टीडीएम प्रयोगशाळेचे प्राध्यापक शशी कुमार मेनन, टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील होमी भाभा, विज्ञान शिक्षण केंद्रातील डॉक्टर मयुरी रेगे यांनी या संघाचे नेतृत्व केले.
- आयआयटी मुंबईतील डॉक्टर राजेश पाटकर, बडोदा येथील एम. एस. विद्यापीठातील डॉक्टर देवेश सुतार यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून काम केले .
- यावर्षीच्या जीवशास्त्र ऑलिंपियाडमध्ये 80 देशातील 305 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
- स्पर्धेत एकूण 29 सुवर्णपदके देण्यात आली.