Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

शाळांमध्ये महावाचन उत्सव ;अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून निवड

  • Home
  • Current Affairs
  • Current Affairs 2024
  • शाळांमध्ये महावाचन उत्सव ;अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून निवड
  • वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम 22 जुलै ते 30 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
  • या उपक्रमासाठी जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून निवड करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
  • शालेय शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला .
  • शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वाचन अत्यंत आवश्यक आहे. वाचनामुळे त्यांचे अभ्यासाच्या गतीमध्ये वाढ होते. वाचनामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासात भर पडते. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळांमध्ये महाराष्ट्रातील वाचन चळवळ हा उपक्रम राबवण्याचा निर्णय 22 नोव्हेंबर 2023 रोजी घेण्यात आला होता.
  • या उपक्रमात 66 हजार शाळा आणि 52 लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता .
  • रीड इंडिया सेलिब्रेशन या संस्थेच्या सहकार्याने हा उपक्रम घेण्यात आला होता .
  • या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष 2024 – 25 मध्ये राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महावाचन उत्सव 2024 हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • उपक्रमात तिसरी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षित आहे .
  • त्यासाठी तिसरी ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते बारावी असे तीन गट करण्यात आले आहेत.

उपक्रमाची वैशिष्ट्ये:

  • वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे
  • विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण करणे
  • मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीशी नाळ जोडणे
  • विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देणे
  • विद्यार्थ्यांमध्ये भाषा संवाद कौशल्य विकसित करणे

 स्वरूप:

  • महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत उपक्रमासाठी स्वतंत्र वेब पोर्टल विकसित करण्यात येईल.
  • उपक्रमात सहभागी विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकावर विचार करतील आणि तो विचार लिखित स्वरूपात संबंधित पोर्टलवर अपलोड करतील.
  • विद्यार्थी वाचन केलेल्या पुस्तकाची सारांश देणारी एका मिनिटाची ध्वनिचित्रफित, ध्वनिफित पोर्टलवर अपलोड करतील.
  • ग्रंथालय प्रदर्शन, पुस्तक मेळावे आयोजित करण्यात येतील.
  • तालुका, जिल्हा, शैक्षणिक विभाग, राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिके दिली जातील.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *