- केंद्रीय दूरसंचार तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांच्या हस्ते इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी) 2024 साठीच्या ‘द फ्युचर इज नाऊ’ या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले.
- आयएमसी 2024 जागतिक पातळीवरील विचारवंत, अग्रणी आणि संशोधक अशा सर्व प्रमुख व्यक्तींना एकमेकांशी सहयोग साधून आपल्या जगात आज परिवर्तन घडवून आणणाऱ्या तंत्रज्ञानांना आकार देण्यासाठी एकत्र आणून भविष्य ही केवळ एक संकल्पना नसून ते वास्तवात घडते आहे हे दाखवून देण्याचा मंच आहे.
- केंद्रीय संचार तसेच ईशान्य प्रदेश विकास मंत्री ज्योतिरादित्य एम.सिंदिया यांनी यावेळी इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 मधील नोंदणीसाठीचे वैशिष्ट्यपूर्ण परस्परसंवादात्मक असे विशेष अॅप्लिकेशन आणि संकेतस्थळ देखील सुरु केले.
- इंडिया मोबाईल काँग्रेस या आशियातील प्रमुख डिजिटल तंत्रज्ञानविषयक प्रदर्शनाचे हे आठवे वर्ष असून केंद्रीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्याकडे या काँग्रेसचे सह-यजमानपद आहे.
- यावर्षी (2024) नवी दिल्ली येथील प्रगती मैदानावर 15 ऑक्टोबरपासून इंडिया मोबाईल काँग्रेस होणार आहे.