- भारत आणि ब्रिटनदरम्यानच्या मुक्त व्यापार कराराला चालना देण्यासाठी ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री डेव्हिड लॅमी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी देशाच्या राजधानीत दाखल झाले.
- भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करारावर 90% सहमती झाल्याचे मानले जात असून या करारावर शिक्कामोर्तब करण्यासाठी ब्रिटन उत्सुक आहे.
- परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, उद्योग व वाणिज्य मंत्री पीयूष गोयल तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी लॅमी चर्चा करतील.