Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

आसियान परिषद : 2024

  • भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणामध्ये आणि हिंद-प्रशांत क्षेत्राबाबतच्या धोरणामध्ये ‘आसियान’ गटाला अत्यंत महत्त्व असून या गटातील सदस्य देशांमध्ये राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य अधिक दृढ होणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन भारताच्या वतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केले.
  • लाओसची राजधानी व्हिएनटाइन येथे ‘असोसिएशन ऑफ साऊथ-ईस्ट एशियन नेशन्स’ (आसियान) दहा देशांच्या संघटनेची परिषद सुरू झाली असून यामध्ये जयशंकर हे भारताचे प्रतिनिधीत्व करत आहेत.
  • मागील वर्षी जाकार्ता येथे झालेल्या या गटाच्या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
  • भारताच्या ॲक्ट ईस्ट धोरणात आसियान गटाला प्रचंड महत्त्व आहे. या धोरणावर भारताने हिंद-प्रशांत धोरण आखले आहे. या गटातील देशांनी एकमेकांशी असलेले राजकीय, आर्थिक आणि सुरक्षा सहकार्य आणखी मजबूत करणे आावश्‍यक आहे. सदस्य देशांमधील जनतेचाही एकमेकांशी संपर्क वाढणे गरजेचे आहे.’’ भारत आणि आसियान गटातील भागीदारीचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत आहे.
  • भारताच्या ‘ॲक्ट ईस्ट’ धोरणाला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. या धोरणाद्वारे भारताने आशिया-प्रशांत क्षेत्रातील देशांबरोबर आर्थिक, धोरणात्मक आणि सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.
  • आसियान’ गटात इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया या देशांचा समावेश आहे.
  • आसियान : (Association of Southeast Asian Nations) ही आग्नेय आशियामधील 10 स्वतंत्र देशांची एक राजकीय व आर्थिक संघटना आहे.
  • आसियानची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलंड ह्या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली.
  • त्यानंतर आसियानचा विस्तार करून ब्रुनेई, बर्मा, कंबोडिया, लाओस व व्हियेतनाम ह्या देशांना प्रवेश देण्यात आलेला आहे.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *