- जपानमधील वादग्रस्त सादो सोन्याच्या खाणीची नोंद सांस्कृतिक वारसास्थळात करण्याचे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा समितीने जाहीर केले आहे.
- दुसऱ्या महायुद्धात कोरियाच्या शेकडो मजुरांच्या छळाचा काळा इतिहास या खाणीला आहे.
- तो जगासमोर आणण्यास जपानने मान्यता दिल्यानंतर सादो खाणीचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- ‘युनेस्को’च्या हा निर्णय म्हणजे जपान आणि कोरियामधील संबंध सुधारल्याचे प्रतीक मानले जात आहे.
आफ्रिकेतील ऐतिहासिक स्थळेही ‘वारसा यादी’त
- दक्षिण आफ्रिकेच्या मुक्तिसंग्रामाशी आणि मानवी हक्कांसाठी लढलेल्या नेल्सन मंडेला यांच्याशी निगडित ऐतिहासिक स्थळांचा’युनेस्को’च्या ‘जागतिक वारसा यादी’त – समावेश करण्यात आला.
- ‘ह्युमन राइट्स, लिबरेशन स्ट्रगल अँड रिकन्सिलिएशन : नेल्सन मंडेला लिगसी साइट्स’ नावाचे नामांकन आफ्रिकन देशाने मांडले होते.
- इटली, दक्षिण कोरिया, सेंट व्हिन्सेंट आणि द ग्रेनेडाइन्स, जपान आणि इटलीसह विविध सदस्यांनी नामांकनाला पाठिंबा दिला.