Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल

 AI परिषदेसाठी नरेंद्र मोदी फ्रान्समध्ये दाखल

 

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या फ्रान्स दौऱ्यावर फ्रान्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यात ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत ‘एआय अॅक्शन समिट’चे सहअध्यक्षपद भूषवतील आणि त्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
  • या वेळी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील ‘सीईओ’ आणि मान्यवर उद्योजक उपस्थित राहणार आहेत. 11 फेब्रुवारी रोजी ‘एआय समिट’ होणार आहे.
  • ‘भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांमधील संबंध मैत्रिपूर्ण असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामध्ये सामायिक हितसंबंध जोपासण्यावरच भर असेल,’ असे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी म्हटले आहे.
  • पॅरिस येथे सुरू कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेला (एआय समिट) जगभरातील राजकीय नेते हजेरी लावणार आहेत.
  • जगात अत्यंत वेगाने बदल होत असलेल्या या उद्योग क्षेत्रातील वर्चस्वावरून सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर ‘एआय’ परिषदेत महत्त्वाच्या विषयांवर जगातील धोरणकर्त्यांमध्ये चर्चा होणार आहे
  • जगभरातील विविध देशांचे प्रमुख, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, विविध कंपन्यांचे प्रमुख आणि जगभरातील शंभर देशांमधील शास्त्रज्ञ या परिषदेत सहभागी होणार आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *