Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

Category: Current Affairs

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश भारताच्यापुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी  इतिहास रचला. दोन्हीसंघांनी अफलातून कामगिरी करून 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश मिळवले. अंतिमफेरीत भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियावर, तर महिला संघाने अझरबैजान संघावर मात केली. भारताच्यापुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताच्यामहिला संघाने चेन्नईत झालेल्या 2022मधील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. करोनाकाळात 2020 आणि 2021मधील स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. यात पुरुष आणि महिला संघ एकत्रित करण्यात आले होते.त्यात 2022मधील स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्त विजेता ठरला होता. बुद्धिबळऑलिम्पियाडमध्ये एकाच वेळी दोन्ही स्पर्धा जिंकणारा भारत हा केवळ सातवा संघ ठरला आहे. एकाचऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग 2018 नंतर प्रथमच घडला. 2018 मध्येचीनने हे यश मिळवले होते. भारताचापुरुष संघ: आर....

Read More
'एनआरएआय'च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

‘एनआरएआय’च्या अध्यक्षपदी कलिकेश सिंह यांची निवड

एअरमार्शल अमर प्रीत सिंग नवीन हवाई दलप्रमुख एअरमार्शल अमर प्रीत सिंग यांची भारतीय हवाई दलाचे नवीन हवाई दल प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. ते28 वे हवाईदल प्रमुख असतील. एअरमार्शल सिंग यांनी पाच हजारांपेक्षा जास्त काळ उड्डाणांचा अनुभव आहे. सिंग सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमानहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. 27 ऑक्टोबर1964 रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना  डिसेंबर 1984 मध्ये भारतीय हवाई दलाच्या ‘फायटर पायलट  स्ट्रीम’मध्ये नियुक्त करण्यात आले होते. सुमारे40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत  त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्याकडेविविध ई प्रकारच्या विमानांच्या पाच हजारहून अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे. तसेच ‘ऑपरेशनल फायटर स्क्वॉड्रन आणि ‘फ्रंटलाइन एअर – बेस’चे त्यांनी नेतृत्व केले आहे. ‘टेस्ट पायलट’ म्हणून त्यांनी मॉस्कोमध्ये ‘मिग-29’ गटाचे नेतृत्व केले होते....

Read More
राष्ट्रीय चित्रपट दिन

राष्ट्रीय चित्रपट दिन

राष्ट्रीय चित्रपट दिन कोरोनाकालावधीनंतर लोकांना चित्रपटगृहांकडे आकर्षित करण्यासाठी 2022 मध्ये राष्ट्रीय चित्रपट दिन सुरू करण्यात आला. आतात्याची तिसरी आवृत्ती 20 सप्टेंबर रोजी साजरी होत आहे. मल्टिप्लेक्सअसोसिएशन ऑफ इंडियाने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनाची तारीख म्हणून 20 सप्टेंबर निश्चित केली आहे. याचित्रपटा दिनानिमित्त देशभरातील चित्रपटगृहांमध्ये सिनेमाप्रेमींसाठी केवळ 99रुपयांमध्ये तिकीट उपलब्ध केली जाणार आहे. पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, मूव्ही टाइम आणि डिलाइटसह चार हजारांहून अधिक स्क्रीनवर चित्रपट दाखवले जाणार आहेत. 2023 यावर्षी 13 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला होता.

Read More
98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण

तेजस  स्क्वाड्रनमध्ये  प्रथमच महिला भारतीयहवाई दलाचे तेजस लढाऊ विमान उडविण्याचा मान प्रथमच महिलेला मिळालेला आहे. स्क्वाड्रनलीडर मोहना सिंह यांची तेजसच्या स्क्वाड्रन पायलट म्हणून निवड झाली आहे. जून2016 मध्ये भारतीय हवाई दलात प्रथमच तीन महिलांची नियुक्ती झाली होती. त्यात मोहना यांचा समावेश होता . मोहनायांची तुकडी गुजरात मधील नलिया येथे असेल. 98 व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण दिल्लीयेथे होणाऱ्या आगामी 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बोधचिन्ह जाहीर करण्यात आले. त्यासाठीघेतलेल्या स्पर्धेतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आणि पेनाच्या निबचा समावेश असलेल्या बोधचिन्हाची संमेलनासाठी निवड करण्यात आली आहे. संमेलनाचेआयोजक असलेल्या ‘सरहद, पुणे’ या संस्थेतर्फे बोधचिन्ह निवडण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आली होती. यात 100 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातूनअंतिम बोधचिन्हाची निवड करण्याची जबाबदारी मनसे पक्षाचे अध्यक्ष व व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली होती. त्यांनीलोणी काळभोर येथील ‘मंथन स्कूल ऑफ क्रिएटिव्हिटी अँड आर्ट’चे संचालक प्रसाद गवळी यांनी सादर केलेल्या बोधचिन्हाची अंतिम निवड केली.

Read More
'एमएएल' नवीन रक्तगट

‘एमएएल’ नवीन रक्तगट

‘एक देश, एक निवडणुकीला मंजुरी’ लोकसभाव राज्यांमधील विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची शिफारस करणाऱ्या रामनाथ कोविंद उच्चाधिकार समितीचा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाने स्वीकारला. याअहवालाच्या अंमलबजावणीसाठी देशव्यापी चर्चा केल्यानंतर सहमतीने ‘एक देश, एक निवडणूक’ धोरण लागू केले जाईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुखविरोधी पक्ष काँग्रेसने मात्र या धोरणाला विरोध केला आहे. अशी असेल प्रक्रिया पहिल्याटप्प्यात लोकसभा व विधानसभांच्या, तर 100 दिवसांनी दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. धोरणलागू करण्यासाठी केंद्राकडून विशिष्ट तारीख जाहीर केली जाईल. त्या तारखेनंतर सर्व राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका घेतल्या जातील. पाचवर्षांच्या निवडणूक चक्रामध्ये खंड पडणार नाही याची तरतूद घटनादुरुस्तीद्वारे केली जाईल. कोणत्याहीकारणाने लोकसभा किंवा विधानसभा भंग करावी लागली तर उर्वरित काळासाठी निवडणूक होईल. त्यानंतरठरलेल्या पाच वर्षांच्या निवडणूक चक्रानुसार लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रित होईल.  ‘एमएएल‘ नवीन रक्तगट ब्रिटनमधील’एनएचएस ब्लड अँड ट्रान्सप्लांट’...

Read More
भारताचे ऐतिहासिक विजेतेपद

भारताचे ऐतिहासिक विजेतेपद

भारताचे ऐतिहासिक विजेतेपद हुलुनबुर, चीनयेथे झालेल्या  आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत चीनचा 1 – 0 असा पराभव करून जेतेपद पटकाविले. याविजेतेपदासह भारताने इतिहास घडवीत पाचव्यांदा (सर्वाधिक वेळा)आशियाई चॅम्पियन्स चषकावर आपले नाव कोरले. भारतानेया स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. भारताच्याजुगराज सिंगने सामना संपण्यास 9 मिनिटे असताना सामन्यातील एकमेव गोल केला. कर्णधारहरमनप्रीतने स्पर्धेत सात गोल केले. हरमनप्रीतला यावेळी प्लेअर ऑफ दि टूर्नामेंटचा किताब मिळाला. भारताला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद चीनचापराभव करून भारताने विक्रमी पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आशियाई विजेतेपद पटकावले. भारतीयसंघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि 25 गोल केले आणि केवळ पाच गोल स्वीकारले. आशियाईहॉकी स्पर्धेला 2011 मध्ये सुरवात झाली. पहिल्या आशियाई हॉकी स्पर्धेचे विजेतेपदही भारतानेच पटकावले होते. आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारे देश...

Read More
'भास्कर' या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

‘भास्कर’ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण

‘भास्कर‘ या डिजिटल प्लॅटफॉर्मचे अनावरण देशातस्टार्टअप क्षेत्राला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भास्कर’ (भारत स्टार्टअप नॉलेज अॅक्सेस रजिस्ट्री) हा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. वाणिज्यमंत्रीपीयूष गोयल यांनी ‘भास्कर’चे उद्घाटन केले. याप्लॅटफॉर्मच्या माध्यमातून स्टार्टअप कंपन्यांना परस्परांशी संवाद साधणे आणि परस्परांना सहकार्य करणे सोपे होणार आहे. देशभरातआतापर्यंत दीड लाख स्टार्टअप ची नोंदणी झाली असून या क्षेत्रात 15 लाख रोजगारांची निर्मिती देखील झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर स्टार्ट क्षेत्रासाठी एकत्रित माहिती उपलब्ध व्हावी यासाठी ही यंत्रणा उभारण्यात आली आहे . वाणिज्यमंत्रालयाच्या अखत्यारीतील औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाच्या वतीने भास्कर प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे . भास्करमुळे भारतीय स्टार्ट परिसंस्थेचा प्रभावीपणे तसेच विविध जगासमोर येईल भास्कर डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्टार्ट क्षेत्रातील उद्योगांना नोंदणीसह संपर्क सहकार्य आणि प्रगतीच्या संधी गुंतवणूकदार उत्पादन सेवा पुरवठादार त्याचप्रमाणे संबंधित सरकारी यंत्रणा अशी सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. असा होईल लाभ देशातीलकुठल्याही कोपऱ्यातील स्टार्टअप कंपनीला संकल्पना विकसित करण्यापासून ते प्रत्यक्ष साकारेपर्यंत ‘भास्कर’ मदत करणार ‘भास्कर’च्यामाध्यमातून स्टार्टअप कंपन्यांना विविध टूल्स, स्रोत आणि माहिती उपलब्ध होणार स्टार्टअपक्षेत्राला त्यांच्या आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन, सक्षम मनुष्यबळाची भरती करणे यांसाठी मदत होणार राष्ट्रीयस्टार्टअप सल्लागार परिषद यासारखी संस्थादेखील या कंपनीसाठी उपयुक्त सल्ला देऊ शकेल.

Read More
जागतिक ओझोन दिन

जागतिक ओझोन दिन

जागतिक ओझोन दिन जागतिकओझोन दिन 2024 ची थीम:’मॉन्ट्रियल प्रोटोकॉल: ॲडव्हान्सिंग क्लायमेट ॲक्शन्स“ आहे जी ओझोन थराचे संरक्षण आणि जागतिक स्तरावर व्यापक हवामान कृती उपक्रम चालविण्यामध्ये मॉन्ट्रियल प्रोटोकॉलची महत्त्वपूर्ण भूमिका दर्शवते 1995 पासूनदरवर्षी 16 सप्टेंबरला संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (UN) पर्यावरण कार्यक्रम विभागातर्फे “आंतरराष्ट्रीय ओझोन दिन” साजरा केला जातो. ओझोनथराच्या संरक्षणासाठी 1887 या वर्षी 16 सप्टेंबर रोजी  कॅनडातील मॉन्ट्रिएल शहरात जगभरातील प्रतिनिधींनी एका आंतरराष्ट्रीय करारावर सह्या केल्या. ओझोनहा वातावरणामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारा एक वायू आहे. ओझोनच्याएका रेणूमध्ये ऑक्सिजनचे तीन अणू असल्यामुळे ओझोनचे रासायनिक सूत्र O3 असे लिहितात. क्रिस्टियनफ़्रेडरिक स्कोएनबेन ह्या जर्मन-स्विस रसायनशास्त्रज्ञाने...

Read More
क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी

क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी उड्डाण चाचणी संरक्षणसंशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ 18 एप्रिल 2024 रोजी ओडिशाच्या किनारपट्टीवरील एकात्मिक चाचणी श्रेणी (आय टी आर ), चांदीपूर इथून स्वदेशी तंत्रज्ञाननिर्मित क्रूझ क्षेपणास्त्राची (आयटीसीएम ) यशस्वी उड्डाण चाचणी केली. चाचणीदरम्यान,  सर्वउद्दिष्टे यशस्वीरित्या साध्य करण्यात आली. रडार, इलेक्ट्रोऑप्टिकल ट्रॅकिंग सिस्टीम (EOTS) आणि आयटीआर द्वारे वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केलेल्या टेलीमेट्री सारख्या अनेक रेंज सेन्सर्सद्वारे क्षेपणास्त्राच्या कामगिरीचे परीक्षण करण्यात आले,ज्यामुळे उड्डाण मार्गाचा संपूर्ण माग घेता आला. तसेचभारतीय हवाई दलाच्या सुखोई (Su-30-Mk-I)विमानातूनही क्षेपणास्त्राच्या उड्डाणावर लक्ष ठेवण्यात आले. क्षेपणास्त्रानेवे पॉइंट नेव्हिगेशनचा (दिशादर्शन)  वापर करून इच्छित मार्गाचा अवलंब केला आणि अत्यंत कमी उंचीवरील समुद्र-स्किमिंग उड्डाणाचे प्रात्यक्षिक केले. यायशस्वी उड्डाण चाचणीने बेंगळुरू येथील गॅस टर्बाइन रिसर्च एस्टॅब्लिशमेंटने,विकसित केलेल्या स्वदेशी प्रणोदन प्रणालीची विश्वसनीय कामगिरीदेखील सिद्ध केली आहे. अधिकउत्तम आणि विश्वसनीय कामगिरी सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक वैमानिकी तंत्रे आणि सॉफ्टवेअर यांनी देखील सुसज्ज  केले आहे. बेंगळूरूस्थितडीआरडीओ प्रयोगशाळेतील वैमानिकी विकास आस्थापनेने (एडीई) इतर प्रयोगशाळा तसेच भारतीय उद्योगांच्या योगदानासह हे क्षेपणास्त्र विकसित केले

Read More