इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (IGF) हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे , जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो. इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम 2023 (IIGF-2023) चे आयोजन प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही माध्यमातून 5 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे.
• 2021 आणि 2022 मध्ये आयआयजीएफच्या पहिल्या दोन आवृत्त्या यशस्वीपणे आयोजित केल्यानंतर, आयआयजीएफची तिसरी आवृत्ती “मूव्हिंग फॉरवर्ड – कॅलिब्रेटिंग इंडियाज डिजिटल अजेंडा” या व्यापक संकल्पनेअंतर्गत आयोजित केली जात आहे.
• भारतासाठी एक सुरक्षित, विश्वासार्ह आणि लवचिक सायबर स्पेस उभारणे , भारताच्या विकासात्मक उद्दिष्टांसाठी नवोन्मेषाला चालना देणे , डिजिटल दरी दूर करणे आणि जागतिक डिजिटल प्रशासन आणि सहकार्यासाठी नेतृत्व यावरील भारताचा डिजिटल अजेंडा निश्चित करणे आदी मुद्द्यांचा सखोल अभ्यास करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
• प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्यांसाठी हा कार्यक्रम नवी दिल्लीतील प्रगती मैदान स्थित भारत मंडपम येथे आयोजित करण्यात आला आहे.
आयआयजीएफ(IIGF) विषयी
• इंडिया इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरम (UN IGF) शी संबंधित उपक्रम आहे.
• इंटरनेट गव्हर्नन्स फोरम हा विविध हितधारकांचा समावेश असलेला एक मंच आहे जो इंटरनेटशी संबंधित सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी विविध गटांच्या प्रतिनिधींना एकत्र आणतो.
• इंटरनेट संधी अधिकाधिक प्रमाणात कशा वाढवायच्या आणि त्यातील संभाव्य धोके आणि आव्हानांना कसे सामोरे जायचे याबद्दल आयजीएफ सर्वांना अवगत करते.
• संयुक्त राष्ट्र इंटरनेट गव्हर्नन्स फोरमची भारतीय आवृत्ती इंडिया जीएफ किंवा आयआयजीएफ ची स्थापना 2021 मध्ये करण्यात आली आणि त्याला सरकार, नागरी संस्था , उद्योग, तांत्रिक समुदाय, विचारवंत , उद्योग संघ यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध 14-सदस्यीय हितधारक समितीचा पाठिंबा आहे.


