बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश
बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला सुवर्णयश भारताच्यापुरुष आणि महिला बुद्धिबळ संघांनी इतिहास रचला. दोन्हीसंघांनी अफलातून कामगिरी करून 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णयश मिळवले. अंतिमफेरीत भारताच्या पुरुष संघाने स्लोव्हेनियावर, तर महिला संघाने अझरबैजान संघावर मात केली. भारताच्यापुरुष संघाने यापूर्वी 2014 आणि 2022च्या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. भारताच्यामहिला संघाने चेन्नईत झालेल्या 2022मधील स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. करोनाकाळात 2020 आणि 2021मधील स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने झाली होती. यात पुरुष आणि महिला संघ एकत्रित करण्यात आले होते.त्यात 2022मधील स्पर्धेत भारतीय संघ रशियासह संयुक्त विजेता ठरला होता. बुद्धिबळऑलिम्पियाडमध्ये एकाच वेळी दोन्ही स्पर्धा जिंकणारा भारत हा केवळ सातवा संघ ठरला आहे. एकाचऑलिम्पियाडमध्ये दोन्ही सांघिक स्पर्धा जिंकण्याचा प्रसंग 2018 नंतर प्रथमच घडला. 2018 मध्येचीनने हे यश मिळवले होते. भारताचापुरुष संघ: आर....
Read More