भारताचे ऐतिहासिक विजेतेपद
भारताचे ऐतिहासिक विजेतेपद हुलुनबुर, चीनयेथे झालेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने अंतिम फेरीत चीनचा 1 – 0 असा पराभव करून जेतेपद पटकाविले. याविजेतेपदासह भारताने इतिहास घडवीत पाचव्यांदा (सर्वाधिक वेळा)आशियाई चॅम्पियन्स चषकावर आपले नाव कोरले. भारतानेया स्पर्धेच्या इतिहासात सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. भारताच्याजुगराज सिंगने सामना संपण्यास 9 मिनिटे असताना सामन्यातील एकमेव गोल केला. कर्णधारहरमनप्रीतने स्पर्धेत सात गोल केले. हरमनप्रीतला यावेळी प्लेअर ऑफ दि टूर्नामेंटचा किताब मिळाला. भारताला सलग दुसऱ्यांदा विजेतेपद चीनचापराभव करून भारताने विक्रमी पाचव्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा आशियाई विजेतेपद पटकावले. भारतीयसंघाने स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आणि 25 गोल केले आणि केवळ पाच गोल स्वीकारले. आशियाईहॉकी स्पर्धेला 2011 मध्ये सुरवात झाली. पहिल्या आशियाई हॉकी स्पर्धेचे विजेतेपदही भारतानेच पटकावले होते. आशियाई स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारे देश...
Read More