सर्वाधिक कर भरण्याच्या यादीत शाहरुख खान अव्वलस्थानी
चित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेचा प्रतिष्ठित पुरस्कार कर्जतचेचित्रकार पराग बोरसे यांना अमेरिकेच्या पेस्टल सोसायटीने 2024 चा ‘फ्लोरा बी गुफिनी मेमोरियल’ पुरस्कार जाहीर झाला आहे. एकहजार अमेरिकन डॉलर्स आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 22 सप्टेंबर2024 रोजी मॅनहॅटन, न्यूयॉर्क येथे त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. न्यूयॉर्कमध्येभरणाऱ्या ‘एंडूरिंग ब्रिलियंस’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांच्या वार्षिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाचे हे 52 वें वर्ष आहे. यावर्षीअमेरिकेच्या पेस्टल सोसायटीला जगभरातून 1155 सबमिशन प्राप्त झाली होती. यापैकी125 कलाकृती प्रदर्शनासाठी निवडल्या गेल्या आहेत. यातपराग बोरसे यांचे सॉफ्ट पेस्टल या माध्यमातून चितारलेले ‘ए टर्बन गेझ’ हे एका फेटा घातलेल्या धनगराचे व्यक्ती चित्राचा समावेश आहे. पेस्टलसोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेची फ्लोरा बी गुफिनी यांनी 1972 मध्ये स्थापना केली....
Read More