नरेंद्र मोदी ब्रुनेई दौऱ्यावर
विषाणू युध्द अभ्यास साथरोगांचेनियंत्रण करण्यासाठीच्या सज्जतेचे मूल्यांकन करण्याच्या उद्देशाने राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत राष्ट्रीय वन हेल्थ अभियानाअंतर्गत (एनओएचएम) “विषाणू युद्ध अभ्यास” (विषाणूविरुद्धच्या लढ्याचा सराव) हे मॉक ड्रील घेण्यात आले. मानवीआरोग्य, पशुपालन तसेच वन्यजीवसंबंधी क्षेत्रातील तज्ञांचा समावेश असलेल्या राष्ट्रीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथकाची सज्जता आणि प्रतिसादात्मक कार्य यांचे मूल्यांकन करण्यासाठी ही सराव चाचणी घेण्यात आली. यासाठीवास्तव जगातील साथरोगाच्या फैलावाची कल्पना करण्यासाठी पशुजन्य आजाराच्या साथीचा फैलाव झाल्याचे दृश्य उभे करण्यात आले. देशातप्रथमच करण्यात आलेल्या अशा प्रकारच्या या सराव चाचणी उपक्रमाचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे.पी.नड्डा यांनी कौतुक केले आहे. राष्ट्रीयरोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी), भारतीय वैद्यकीय संशोधन मंडळ (आयसीएमआर), आरोग्य सेवा महासंचालनालय (डीजीएचएस), केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभाग तसेच सामाजिक आरोग्य केंद्र यांतील डॉक्टर्स आणि कर्मचारीवर्ग या सराव चाचणीमध्ये सहभागी झाला होता. हीसराव चाचणी पुढील दोन महत्त्वाच्या घटकांवर आधारित होती : अ) नकली साथीच्या प्रसारासाठी जबाबदार असलेल्या विषाणूच्या अस्तित्वासाठी तपासणी तसेच निश्चित निदान आणि ब) माणसांमध्ये तसेच प्राण्यांमध्ये या आजाराच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी केलेली कार्यवाही. यासंदर्भातीलप्रतिसादाचे स्वतंत्र निरीक्षकांकडून निरीक्षण करण्यात आले....
Read More