इस्रो स्पेस डॉकिंगच्या दिशेने
भारतीयअवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) ‘स्पेस डॉकिंग’ या अतिशय महत्त्वाच्या तंत्रज्ञानाचा प्रयोग हाती घेतला आहे. तो यशस्वी झाला, तर अमेरिका, चीन, रशिया या देशांच्या रांगेत भारताला स्थान मिळेल. 7 जानेवारीच्याआसपास या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. ‘पीएसएलव्हीसी 60 स्पाडेक्स’ मोहीम यशस्वी झाल्याची माहिती मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी दिली. रॉकेटने475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत उपग्रहांना यशस्वीपणे नेले. पंधरामिनिटांच्या उड्डाणानंतर उपग्रहे नियोजित कक्षेत पोहोचली. स्पाडेक्सउपग्रह एकामागोमाग एक कक्षेत गेले. काही काळानंतर दोन्ही उपग्रह एकमेकांपासून अधिक अंतरावर असतील. त्यानंतर ‘स्पेस डॉकिंग’चा प्रयोग सुरू होईल. हीप्रक्रिया पुढील आठवड्यात होण्याची अपेक्षा आहे....
Read More