सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
शक्तिशाली देशांच्या यादीत भारत तिसऱ्या स्थानी आशियातालशक्तिशाली देशांच्या निर्देशांकात (एशिया पॉवर इंडेक्स) भारताने जपानला मागे टाकत तिसरे स्थान पटकाविले. केंद्रसरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने ही माहिती दिली. भारताच्यावाढत्या विकास दराबाबत ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट या संस्थेने 27 देशांच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना या क्रमवारीमध्ये भारत ही तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असल्याचे जाहीर केले. बाह्यआक्रमणासह सर्वप्रकारची संकटे दूर ठेवण्याची एखाद्या देशाची क्षमता कितपत आहे, या निकषाच्या आधारे एशिया पॉवर इंडेक्समध्ये प्रभावी देशांची क्रमवारी ठरविली जाते. कोरोनाच्याजागतिक साथीनंतर भारताचा आर्थिक विकास वेगाने झाला. अर्थव्यवस्थेचा विस्तार त्याचप्रमाणे लोकांच्या संख्येत वाढ या कारणांनी भारताची स्थिती मजबूत झाल्याने आशियातील शक्तिशाली देशांच्या निर्देशांकात देशाची कामगिरी सुधारली यामुळे जागतिक व्यासपीठावर भारताची भूमिका आगामी काळात आणखीन महत्त्वाची होऊ शकते. गेल्यावर्षीतिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानला भारताने मागे टाकले. यायादीत अमेरिका सर्वोच्च स्थानी असून चीनचा दुसरा क्रमांक आहे त्यानंतर भारत, जपान, ऑस्ट्रेलिया आणि रशिया अशी क्रमवारी आहे. सुरेशकुमार मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन प्रमुख न्यायाधीश म्हणून सुरेश कुमार कैत यांनी शपथ घेतली. मध्यप्रदेशचे राज्यपाल मंगुभाई पटेल यांनी राजभवनमध्ये झालेल्या कार्यक्रमात कैत यांना शपथ दिली. कैतयांनी यापूर्वी तेलंगण, आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे....
Read More