पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुधाबीच्या पहिल्या हिंदू दगडी मंदिराचे भक्तिगीत स्वामीनारायण आणि संप्रदायाच्या आध्यात्मिक नेत्यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. अबुधाबीमध्ये बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने मंदिर बांधले आहे. 1200 मंदिरांमध्ये एकाच वेळी होणाऱ्या ‘ग्लोबल आरती’मध्ये पंतप्रधानांनी भाग घेतला. त्याआधी मोदी यांनी येथे पहिल्या हिंदू दगडी मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या विविध धर्मांतील लोकांची भेट घेतली.
27 एकरांमध्ये मंदिर…
● 27 एकरांमध्ये पसरलेल्या या ऐतिहासिक स्थळावर पहिले हिंदू मंदिर उभे राहिले आहे.
● भारतीय संस्कृती आणि संयुक्त अरब अमिरातीची (यूएई) ओळख, असे एक अनोखे नाते या ठिकाणी निर्माण झाले आहे.
● सुमारे 700 कोटी रुपये या मंदिराच्या कामासाठी खर्च करण्यात आला आहे.