मराठीला अभिजात दर्जा देण्याचा विषय केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याने त्यासाठीचा केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी राज्य मराठी भाषा विभागाने माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच जणांची समिती स्थापन केली आहे. यात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख आणि पुण्यातील सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार यांचा समावेश आहे.
अधिक माहिती
● मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा तज्ञ संशोधकांची समिती 10 जानेवारी 2012 च्या शासन निर्णयानुसार स्थापन केली होती.
● या समितीने इतिहास संशोधन अहवाल शासनास सादर केला आहे.
● या अहवालामध्ये मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी विहित केलेल्या निकषांची पूर्तता करते, हे पुराव्यासह स्पष्ट केले आहे.
● मात्र केंद्र सरकारने अद्याप मराठीला अभिजात दर्जा दिला नसल्याने ही तज्ञांची समिती केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे.