कोलंबिया येथील मेडलीन या ठिकाणी सुरू असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अभिषेक वर्मा याने (स्टेज थ्री) प्रकारात सुवर्णपदक पटकावले.
जागतिक स्पर्धेत अभिषेक वर्माची कामगीरी:
- अभिषेक वर्मा याने जागतिक स्पर्धेमध्ये भारतासाठी पदकांची लई लूट केली आहे त्याने 2015 मध्ये पोलंड येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये पहिले सुवर्णपदक जिंकले होते.
- त्यानंतर अभिषेक ला 2021 मध्ये पॅरिस येथे झालेल्या जागतिक स्पर्धेमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकण्यात यश आले होते.
- आणि आता कोलंबियातील स्पर्धेत त्याने तिसरे सुवर्णपदक पटकावले आहे.
- जागतिक स्पर्धेत अभिषेकने आतापर्यंत तीन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य पदक आणि एक कांस्यपदक देखील पटकावले आहे.


