Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अभ्यास’ या प्रणालीच्या विकासात्मक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण

  • Home
  • Current Affairs
  • अभ्यास’ या प्रणालीच्या विकासात्मक चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण
  • ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी तळावरून (आयटीआर) संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) हाय स्पीड एक्सपेंडेबल एरियल टार्गेट (हीट) ‘अभ्यास’ या प्रणालीच्या सलग सहा विकासात्मक चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
  • सुधारित रॉकेट (बूस्टर) जुळणीसह अभ्यास प्रणालीच्या आत्तापर्यंत 10 विकास चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.
  • सुधारित रडार क्रॉस सेक्शन, व्हिज्युअल आणि इन्फ्रारेड ऑगमेंटेशन सिस्टीमचा वापर करून या चाचण्या घेण्यात आल्या.
  • चाचण्यांदरम्यान रॉकेटच्या सुरक्षित उड्डाणाबरोबरच प्रक्षेपकाची दीर्घकाळ टिकणारी क्षमता आजमावण्यात आली.
  • 30 मिनिटांच्या अंतराने दोन प्रक्षेपणं पाठोपाठ केली गेली. त्यामुळे कमीतकमी लॉजिस्टिकचा वापर करून सहजपणे झालेली उड्डाणं करता आली.
  • डीआरडीओच्या बंगळुरूस्थित एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटने अभ्यासची रचना केली असून – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि लार्सन अँड टुब्रो या उत्पादक कंपन्यांनी ते विकसित केले आहे.
  • ही स्वदेशी प्रणाली ऑटो पायलटच्या मदतीने स्वायत्त उड्डाणासाठी तयार करण्यात आली आहे. त्यात लॅपटॉप-आधारित विमानासाठीची भूमी नियंत्रण प्रणाली, उड्डाणपूर्व तपासणी उपलब्ध आहे.
  • उड्डाणानंतरच्या विश्लेषणासाठी उड्डाण कालावधीतील माहितीची नोंद हे या प्रणालीचे एक वैशिष्ट्य देखील आहे.
  • रॉकेटची रचना प्रगत प्रणाली प्रयोगशाळेने केली आहे आणि नेव्हिगेशन प्रणाली हैदराबादच्या रिसर्च सेंटर इमारातने विकसित केली आहे.
  • या प्रस्थापित उत्पादन संस्थांमध्ये आता अभ्यास उत्पादनासाठी सज्ज आहे

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *