अमेरिका विकासनिधी बंद
- अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘यूनायटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट’ अर्थात अमेरिकी आंतरराष्ट्रीय विकास निधी (यूएसएआयडी) बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंतरराष्ट्रीय विकासनिधीचे काम काय ?
- यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट (यूएसएआयडी) ही अमेरिकी सरकारची स्वतंत्र अशी यंत्रणा आहे.
- त्याची स्थापना सन 1961 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांनी केली होती.
- जागतिक आरोग्य, आर्थिक विकास, नैसर्गिक आपत्ती आणि लोकशाही मूल्यांचे जतन आणि संवर्धन यासाठी काम करणे हे या संस्थेचे ध्येय आहे.
- शंभरपेक्षा जास्त देशांमध्ये त्याचे काम सुरू आहे.
संस्थेला ट्रम्प यांचा धक्का
- अलीकडेच अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने सर्व परकीय निधी थांबवण्याच्या निर्णयामुळे विकासनिधी संस्थेला मोठा धक्का बसला आहे.
- ट्रम्प यांच्या याबाबतच्या आदेशामुळे या संस्थेच्या अनेक मानवतावादी, विकास कार्यक्रमांवर गदा येऊ शकते.
- कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवरही संक्रांत येऊ शकते.
खर्च कमी करण्याचे कारण
- ‘या स्वतंत्र विभागासाठीचा खर्च प्रचंड होत असल्याचे ट्रम्प प्रशासनाला वाटत आहे,’ असे ट्रम्प यांचे सहकारी आणि ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ‘एक्स’वर म्हटले आहे.
- ‘या संस्थेसाठी मोठा खर्च होत असून, वाचणारा निधी अन्यत्र विकासकामांसाठी वापरला जाणार आहे.