‘यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस’ने (यूएससीआयएस) नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 2023 च्या वार्षिक अहवालानुसार विविध देशातील नागरिकांना अमेरिकेचे नागरिकत्व देण्यात आले. त्यामध्ये 59,000 भारतीयांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
अधिक माहिती
● जगभरातील अंदाजे 8.7 लाख विदेशी नागरिकांनी सन 2023 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले.
● त्या आधीच्या वर्षी ही संख्या 9.7 लाख होती.
● या नागरिकत्वामध्ये 6.7टक्के भारतीयांना म्हणजेच 59,000 जणांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले.
● एकूण टक्केवारीत मेक्सिकोतील नागरिकांची टक्केवारी सर्वाधिक 12.7 असून, त्यानंतर भारतीयांचा नंबर लागतो.
● सन 2023 या आर्थिक वर्षात सुमारे 8.7 लाख परदेशी नागरिक अमेरिकेचे नागरिक झाले आहेत. त्यापैकी 1.1 लाख मेक्सिकन नागरिकांना नागरिकत्व मिळाले.
● नव्याने नोंदणी झालेल्यांपैकी 35,200 नागरिक हे डोमिनिकन प्रजासत्ताकातील असल्याचा दावाही अहवालात केला आहे.
● नवीन नागरिकत्व मिळालेल्यांची आकडेवारी – 8,78,500
अमेरिकेचे नागरिकत्व मिळणारे जगातील पहिले तीन देश
● मेक्सिको – 1,11,500 (12.7%)
● भारत – 59,100(6.7%)
● फिलिपिन्स – 44,800(5.1%)
अमेरिकेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी इमिग्रेशन अँड नॅशनॅलिटी अॅक्ट (आयएनए) मध्ये नमूद केलेल्या काही पात्रतेच्या अटींची पूर्तता करणे आवश्यक. उदाहरणार्थ, किमान पाच वर्षे कायदेशीर स्थायी रहिवासी (एलपीआर) असणे आवश्यक आहे.