Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प

विद्यार्थी दिन

  • बी.आर. आंबेडकर यांच्या स्मरणार्थ 7 नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी दिन साजरा केला जातो.
  • महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 27 ऑक्टोबर 2017 रोजी संपूर्ण भारतीय राज्यात 7 नोव्हेंबर हा दिवस ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
  • शिष्यवृत्ती आणि ज्ञानाचा उच्च दर्जा असूनही आंबेडकरांनी स्वतःला आजीवन विद्यार्थी मानले.  आणि ते एक आदर्श विद्यार्थी बनले म्हणून सरकारने त्यांचा शाळा प्रवेशाचा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला.
  • या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये आंबेडकरांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.
  • 7 नोव्हेंबर 1900 रोजी, आंबेडकरांनी पहिल्या इंग्रजी इयत्तेत महाराष्ट्रातील सातारा येथील राजवाडा चौक येथील शासकीय हायस्कूल (आताचे प्रताप सिंग हायस्कूल) मध्ये प्रवेश केला . येथे ते 1904 पर्यंत म्हणजेच चौथीपर्यंत शिक्षण घेतले.

कर्करोग जागरूकता दिन

  • भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस साजरा केला जातो.
  • देशातील वाढत्या कर्करोगाच्या प्रमाणाबाबत जागरूकता वाढवणे तसेच प्रतिबंध, लवकर निदान आणि उपचार यासाठीची पावले उचलण्यास प्रेरित करणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
  • राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस अधिकृतपणे साजरा करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे.
  • किरणोत्सरांचा  शोध लावणाऱ्या आणि ज्यांच्या कार्याचा कर्करोगाच्या उपचारांवर सखोल परिणाम झाला आह अशा, नोबेल पारितोषिक विजेत्या मादाम मेरी क्युरी यांचा जन्मदिवस म्हणूनच केवळ ही तारीख निवडली गेली नाही, तर सार्वजनिक आरोग्याला प्राधान्य म्हणून कर्करोगाला संबोधित करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचे प्रतिबिंब देखील आहे.
  • मुख्यत्वे जीवनशैलीतील बदल, तंबाखूचा वापर, वाईट आहाराच्या सवयी आणि कमी  शारीरिक हालचाल या मुख्य कारणांमुळे 4 अब्जाहून अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
  • एका अंदाजानुसार, दरवर्षी सुमारे 800,000 नवीन कर्करोगाची नवी प्रकरणे नोंदविली जातात.
  • तंबाखू-संबंधित कर्करोग रुग्णांपैकी पुरुषांचे प्रमाण 35-50% आणि स्त्रियांचे प्रमाण 17% इतके आहे.तथापि,विविध प्रकारचे कर्करोग प्रतिबंधात्मक उपाय योजून टाळता येण्याजोगे आहेत, तसे25 व्यापक जागरूकता आणि वेळेवर हस्तक्षेप करून, भारत कर्करोगाचा भार लक्षणीयरीत्या कमी करत आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प

  • संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माजी अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरीस यांचा पराभव केला.
  • डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार असून त्यांची ही अध्यक्ष पदाची दुसरी टर्म असेल .
  • बहुमतासाठी आवश्यक असलेला 270 मतांचा टप्पा ट्रम्प यांनी पार केला .
  • ट्रम्प यांना 292 मते पडली तर कमला हॅरीस यांना 224 मते पडली.

ट्रम्प यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात आढावा

  • न्यूयॉर्क राज्यातील क्वीन्स येथे 14 जून 1946 रोजी जन्म
  • वडील फ्रेड ट्रम्प बांधकाम क्षेत्रातील यशस्वी विकासक
  • न्यूयॉर्क मिलिटरी अकादमी, पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन स्कूल ऑफ फायनान्स अँड कॉमर्स येथे शिक्षण
  • 1971 मध्ये वडिलांचा व्यवसाय हाती घेतला
  • हॉटेल, रिसॉर्ट, निवासी आणि व्यावसायिक इमारती, कॅसिनो आणि गोल्फ कोर्सचे अनेक प्रकल्प
  • एकूण संपत्ती – सहा अब्ज डॉलर
  • ट्रम्प यांच्या मालकीचे अनेक गोल्फ कोर्स, मोठमोठे बंगले, वायनरी आणि 1991चे बोइंग 757 विमान आहे. या विमानाचे नाव त्यांनी ‘ट्रम्प फोर्स वन’ असे ठेवले आहे.
  • ‘द आर्ट ऑफ द डील’ हे पहिले पुस्तक 1987मध्ये प्रसिद्ध, त्यानंतर अनेक पुस्तकांचे लेखन
  • 2004मध्ये ‘द अॅप्रेन्टिस’ या रिअॅलिटी टीव्ही कार्यक्रमाला सुरुवात
  • 2016 साली ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेसह अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी
  • अध्यक्ष म्हणून महत्त्वाच्या कर सुधारणा विधेयकावर स्वाक्षरी
  • संरक्षणवादाला प्राधान्य देताना परदेशी अॅल्युमिनियम, पोलाद आणि अन्य उत्पादनांवरील आयात शुल्कात वाढ
  • मेक्सिको, कॅनडा, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया या देशांशी व्यापार करारावर फेरवाटाघाटी
  • सर्वोच्च न्यायालय, फेडरल न्यायाधीशांच्या नेमणुका, लष्करी खर्चात वाढ, सीमा व इमिग्रेशनवर आक्रमक नियंत्रण, गुन्हेगारी कायदा सुधारणा आणि औषधांच्या किमतींमध्ये घट यासंबंधी महत्त्वाचे निर्णय

सिकंदर ठरला रुस्तमहिंद

  • महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने या वर्षीचा ‘रुस्तम ए हिंद’ हा किताब पटकावला. अशी कामगिरी करणारा तो महाराष्ट्राचा चौथा मल्ल ठरला.
  • पुण्यातील पुनीत बालन समूहाकडून साथ मिळणाऱ्या सिकंदरने बग्गा कोहलीला पराभूत करत हा प्रतिष्ठेचा किताब मिळवला.
  • पंजाबमध्ये जालंधर जिल्ह्यातील जांडला येथे ही स्पर्धा झाली.
  • विजेतेपदासाठी सिकंदरला मानाची गदा ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक मिळाले.
  • मागील वर्षी सिकंदरने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकली होती.
  • रुस्तम ए हिंद चा किताब जिंकणारा सिंकंदर चौथा खेळाडू
  • रुस्तम ए हिंदचा किताब जिंकणारा सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा चौथा खेळाडू ठरला.
  • याआधी हरिश्चंद्र बिराजदार, अमोल बुचडे, असाब अहमद या महाराष्ट्राच्या मल्लांनी हा किताब मिळवला होता.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *