Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

अर्जेंटिनाचे 16 वे विजेतेपद

  • अर्जेंटिनाने फुटबॉल विश्वातील आपले वर्चस्व कायम राखताना विक्रमी 16 व्यांदा कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
  • अर्जेंटिनाने 2021 मध्ये झालेल्या गेल्या कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते.
  • त्यानंतर 2022 मध्ये त्यांनी विश्वविजेते पदावर मोहरे उमटवली होती आणि आता कोपा अमेरिकेचा करंडक आपल्याकडेच राखताना सलग तीन मोठ्या स्पर्धा जिंकण्याची किमया अर्जंटीनाच्या संघाने केली.
  • कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाने कोलंबीयाचा 1 – 0 असा पराभव केला.
  • कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेतेपद सर्वाधिक वेळा अर्जेंटिनाने(16) पटकावले. त्याखालोखाल उरूग्वेने 15 वेळा तर ब्राझीलने 9 वेळा पटकावले.

कोपा अमेरिका 2024

  • कोपा आमेरिका ही कॉन्मेबॉल ह्या दक्षिण अमेरिकेमधील फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे.
  • कोपा आमेरिकाच्या विजेत्याला फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.
  • इ.स. 1916 साली पहिली कोपा आमेरिका स्पर्धा भरवली गेली. तेव्हापासून दर चार वर्षांनी ह्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे.
  • स्पर्धा : 48 वी
  • सर्वोत्तम खेळाडू :जेम्स रॉड्रिग्ज (कोलंबिया)
  • अंतिम सामना : मियामी,फ्लोरिडा अमेरिका

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *