● अवकाश प्रवासाच्या क्षेत्रात भारताच्या शिरपेचात बुधवारी (25 जून) 12.01 मिनिटांनी आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला.
● अमेरिकेच्या ‘स्पेस एक्स’ कंपनीच्या फाल्कन-9 अवकाशयानाचे फ्लोरिडाच्या केनडी स्पेस सेंटर येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
● या यानातून ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या रूपाने दुसरा भारतीय अंतराळवीर अवकाशात पोहोचला.
● राकेश शर्मा यांच्यानंतर 41 वर्षांनी भारतीय अंतराळवीराला हा बहुमान मिळाला. त्यांच्या बरोबर अमेरिकेच्या पेगी व्हिट्सन या ‘अॅक्सिऑम 4’ मोहिमेच्या कमांडर असून, पोलंडचे स्लॅवोझ ऊझान्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू यांचा मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट म्हणून सहभाग आहे.
● आज, दिनांक 26 जून रोजी सायंकाळी 4.30 मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) या यानातील कुपी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाशी (आयएसएस) जोडली जाईल.
● हादेखील भारतासाठी ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
● भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा हे तत्कालीन सोव्हिएत महासंघाच्या मोहिमेद्वारे 1984 मध्ये अंतराळात गेले होते.
● तेथे ते आठ दिवस होते.
● त्यानंतर 41 वर्षांनी शुक्ला हे अंतराळात जाणारे दुसरे भारतीय तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर आहेत.
● ‘अॅक्सिऑम-4’ मोहिमेंतर्गत ‘स्पेस एक्स’चे ‘फाल्कन-9’ रॉकेट फ्लोरिडामधील केनेडी अवकाश केंद्रातून अंतराळवीरांना घेऊन भारतीय स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.०१ मिनिटांनी उडाले.
● या मोहिमेचे सारथ्य ग्रुप कॅप्टन शुक्ला करीत असून, मोहिमेचे नेतृत्व ‘नासा’च्या पेगी व्हाइट्सन करीत आहेत.
● कक्षेत स्थिर झाल्यानंतर अंतराळवीरांनी त्यांच्या अवकाशकुपीचे ‘ग्रेस’ नाव जाहीर केले.
● खराब हवामान, ऑक्सिजनची गळती, आयएसएसवरील हवेच्या दाबाची गळती आदी कारणांमुळे ‘अॅक्सिऑम ४’ मोहिमेचे प्रक्षेपण अनेकदा पुढे ढकलण्यात आले होते.
● मोहिमेसमोरील सर्व अडचणी दूर झाल्यावर अखेर बुधवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२ वाजून एक मिनिटांनी फाल्कन ९ रॉकेटने यशस्वी उड्डाण केले.
● दोन टप्प्यांच्या या रॉकेटने पुढील दहा मिनिटांत ‘क्रू ड्रॅगन सी २१३’ या नव्या अवकाशकुपीला पृथ्वीभोवतीच्या अपेक्षित कक्षेत यशस्वीपणे प्रस्थापित केले.
● मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडल्याची घोषणा मिशन पायलट शुक्ला यांनी हिंदीतून करताच मोहिमेच्या कंट्रोल रूमसह भारतातही जल्लोष साजरा झाला.
● आयएसएसवर पोचल्यानंतर चौघे अंतराळवीर 14 दिवस अवकाशात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणातील विविध 60 वैज्ञानिक प्रयोग पार पाडतील.
● ‘इस्रो’चे सात, तर ‘नासा’ सोबतचे आणखी पाच प्रयोग करण्याची जबाबदारी शुक्ला यांच्याकडे असेल.
● त्याचसोबत शुक्ला अवकाशातून भारतीय विद्यार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधतील.
अंतराळ स्थानकात तिघांची मोलाची साथ…
● ‘अॅक्सिऑम-4’ मोहिमेचे 26 जून रोजी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वी उड्डाण झाले.
● पेगी व्हिटसन या अमेरिकी अंतराळवीर मोहिमेचे नेतृत्व करत आहेत.
● त्याचबरोबर हंगेरीचे टिबोर कापू आणि पोलंडचे श्लावोज उझ्नास्की-विइिनवस्की हे दोघेही या मोहिमेत आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय…
पेगी व्हिटसन :
● अमेरिकेच्या आयोवा राज्यातील शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या पेगी व्हिटसन यांनी 1969 मध्ये दूरदर्शनवर मानवाच्या पहिल्यावहिल्या चांद्रमोहिमेची दृश्ये पाहिली. ती त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली. तेव्हाच त्यांनी आपल्याला अंतराळवीर व्हायचे आहे, असे ठरवले.
● 1981 मध्ये त्यांनी बायोकेमिस्ट्री या विषयात डॉक्टरेट केले.
● 1989 मध्ये त्या नासामध्ये रुजू झाल्या.
● नासामधून 2018 मध्ये मुख्य अंतराळवीर या पदावरून निवृत्त झालेल्या 65 वर्षांच्या पेगी व्हिटसन यांना त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत अंतराळातील एकंदर 675 दिवसांच्या निवासाचा अनुभव आहे.
● 2002 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या पाचव्या मोहिमेत सहभाग घेतला. तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत सहा वेळा अंतराळ प्रवास केला आहे.
टिबोर कापू
● 5 नोव्हेंबर 1991 रोजी हंगेरीतील व्हासारोस्नामेनी येथे जन्मलेले टिबोर कापू हे मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. अंतराळात भरारी घेणारे ते तिसरे हंगेरियन आहेत.
● यापूर्वी बर्टलान फर्कास आणि चार्ल्स सिमोनी यांनी ही कामगिरी केली आहे.
● तर्क क्रीडा क्षेत्रातील दोनदा जागतिक कनिष्ठ विजेतेपद मिळवलेल्या टिबोर यांनी बुडापेस्ट विद्यापीठातून तंत्रज्ञान आणि अर्थशास्त्र या विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे.
● हंगेरी सरकार आणि अॅक्सिऑम यांच्यात झालेल्या करारानुसार टिबोर यांना अॅक्सिओम मोहिमेत सहभागी होण्यासाठी नासा येथे पाठविण्यात आले.
श्लावोज उझ्नास्की-विइिनवस्की :
● श्लावोज हे अंतराळात प्रवास करणारे दुसरे पोलिश अंतराळवीर आहेत.
● 12 एप्रिल 1984 रोजी जन्मलेले श्लावोज इंजिनीअर आहेत. त्यांच्या जन्मदिनाचे वैशिष्ट्य म्हणजे युरी गागारिन यांनी याच दिवशी 1961 मध्ये सर्वप्रथम अंतराळ प्रवास केला होता.
● त्यामुळे दर वाढदिवशी त्यांची आई श्लावोज यांना अंतराळ दिनाच्या शुभेच्छा द्यायची.
● श्लावोज 2011 मध्ये जीनिव्हातील युरोपीयन ऑर्गनाझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (सीईआरएन) या संस्थेत रुजू झाले.
● 2013 मध्ये त्यांची प्रकल्प प्रमुखपदी नियुक्ती झाली.
शुभांशू शुक्लांविषयी…
● उत्तर प्रदेशातील लखनौ येथे 10 ऑक्टोबर 1985 मध्ये जन्म
● राकेश शर्मा यांच्या ऐतिहासिक उड्डाणानंतर एका वर्षाने, 10 ऑक्टोबर 1985 रोजी लखनौमध्ये शुक्ला यांचा जन्म झाला.
● सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून (सीएमएस) त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले.
● नंतर सैन्यदलाच्या प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत त्यांची निवड झाली.
● 2006 मध्ये त्यांची हवाई दलात नियुक्ती झाल्यापासून, सु-30 एमकेआय, मिग-29, जॅग्वार आणि डॉर्नियर-228आदी विमानांच्या दोन हजार तासांहून अधिक उड्डाणांचा त्यांना अनुभव आहे.
● ‘शुक्स’ या कॉलसाइनद्वारे ओळखले जाणारे शुभांशू यांच्या गाठीशी आहे.
● भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू येथून एरोस्पेस इंजिनीअरिंगमधील एमटेक हा त्यांच्या तांत्रिक शिक्षणाचा पाया आहे.
● 2019 मध्ये गगनयान मोहिमेसाठी निवड झाल्यानंतर, रशियातील गागारिन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटर आणि इस्रोची अॅस्ट्रॉनॉट ट्रेनिंग फॅसिटिली, बेंगळुरू येथे त्यांनी व्यापक प्रशिक्षण घेतले.
● ‘आपल्याला आयुष्यात नेमके काय हवे आहे, याबाबत शुभांशू यांची एकाग्रता, ऊर्जा कमालीची आहे.
● एकदा ठरवले, की ते पूर्णपणे त्यावर लक्ष केंद्रीत करतात,’ शुभांशू हे ‘अंतराळ तंत्रज्ञानातील ‘कामकाजात तल्लख’, ‘अतिशय हुशार’ आणि ‘लक्ष केंद्रीत करून काम करणारे’ आहेत,
● ‘अॅक्झिओम-4’ साठी पायलट म्हणून त्यांची निवड
या मोहिमेदरम्यान शुभांशू शुक्ला यांचे बोल…
● नमस्कार, माझ्या प्रिय देशवासीयांनो.
41 वर्षांनंतर आपण पुन्हा अवकाशात पोहोचलो आहोत. किती अद्भुत प्रवास होता हा.
सध्या आम्ही पृथ्वीभोवती 7.5 किलोमीटर प्रति सेकंद वेगाने फिरत आहोत.
● माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे, जो मला सांगत आहे की, मी एकटा नाही. मी तुम्हा सर्वांसोबत आहे. ही केवळ ‘आयएसएस ‘पर्यंत माझ्या प्रवासाची सुरुवात नाही, तर भारताच्या मानवी अंतराळ उड्डाणाचीही सुरुवात आहे. तुम्ही प्रत्येकाने या प्रवासाचा भाग होण्याची इच्छा मी व्यक्त करतो.
● चला आपण एकत्रितपणे भारताच्या मानवी अंतराळ कार्यक्रमाला सुरुवात करू. जय हिंद ! जय भारत !
काय आहे अॅक्सिऑम -4 ‘ मोहीम ?
● नासा, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्त्रो या दिग्गज अंतराळ संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली जात आहे.
● इस्रो व नासाने केलेल्या संयुक्त कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अंतराळवीर पाठवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
● या करारानंतरच्या पहिल्या मोहिमेअंतर्गत शुभांशु शुक्ला अवकाशात झेपावले आहेत. मोहिमेत सहभागी असलेले सर्वजण अवकाशात 14 दिवस राहणार आहेत.
● मोहिमेचे नेतृत्व कमांडर पॅगी व्हिटसन या करीत असून, अंतराळवीर शुभांशु शुक्ला पायलट असतील.
● हंगेरीचा अंतराळीवर टिबोर कपू आणि पोलंडचा स्लोव्होज उइनान्स्की विस्निव्हस्की तज्ज्ञ म्हणून सोबत गेले आहेत. शुक्ला हे भारताच्या आगामी ‘गगनयान’ मोहिमेतही सहभागी होणार असल्याने या मोहिमेचा त्यांना फायदा होणार आहे .
● 1984 मध्ये भारताचे अंतराळवीर विन कमांडर राकेश शर्मा हे सोवेद संघ मिशन सोबत अंतराळात गेले होते.
मोहिमेची उद्दिष्टे :
● अॅक्सिऑम 4 ही व्यवसायिक मोहीम आहे.
● त्यामध्ये अंदाजे 60 वैज्ञानिक प्रयोग केले जातील .
● हे प्रयोग जगभरातील 31 देशांनी दिले आहेत.
● या मोहिमेसाठी भारताने 550 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.
● ‘रिअलाइझ द रिर्टन’ असे या मोहिमेचे ब्रीदवाक्य आहे.
● सूक्ष्म गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल.
● या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.
● टाडींग्रेड या सूक्ष्म जलचराची अवकाशात वाढ करून त्याच्यावर अवकाशातील विविध घटकांचा होणारा परिणाम अभ्यासला जाईल.
● सात प्रकारच्या बियाणांवर, कडधान्यांवर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम अभ्यासला जाईल.
● बियाणे, कडधान्ये जमिनीवर आणल्यानंतर त्याचे जनुकीय विश्लेषण करणे हे मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
● सायनोबॅक्टेरिया हे जलचर जिवाणू आणि सूक्ष्मशैवालांच्या प्रजाती सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात पाठवून त्याचा तुलनात्मक अभ्यास केला जाईल.
अंतराळस्थानकातील आयुष्य नेमके कसे?
● शुभांशू शुक्ला आणि इतर तीन आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) जाण्यासाठी अवकाशात झेप घेतली आहे.
● या पार्श्वभूमीवर अंतराळ स्थानकातील (आयएसएस) जीवनशैली आणि कार्यपद्धतीबाबत उत्सुकता वाढली आहे.
‘आयएसएस’ म्हणजे काय ?
● आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर उंचीवर फिरणारी एकमेव अद्वितीय वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे.
● याला अनेकदा अंतराळातील शहर असेही म्हटले जाते.
● येथे अंतराळवीर मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये (अल्प गुरुत्वाकर्षण) राहून आपले काम करतात. असे अनेक वैज्ञानिक प्रयोग येथे केले जातात, जे पृथ्वीवर शक्य नसतात.
●’आयएसस’ वरील जीवन पृथ्वीवरील दैनंदिन जीवनापेक्षा पूर्णपणे वेगळे असते.
● येथे अंतराळवीर फ्रीझ-ड्राइड अन्न खातात. ते पाण्यात मिसळून खावे लागते.
● घाम आणि लघवीचे शुद्धीकरण करून तेच पाणी पुन्हा पिण्यासाठी वापरले जाते.
● अंतराळवीर भिंतीला लावलेल्या झोपण्याच्या पिशव्यांमध्ये झोपतात; कारण गुरुत्व नसल्यामुळे शरीर हवेत तरंगते.
● शरीर कमकुवत होऊ नये म्हणून दररोज तासभर व्यायाम करावा लागतो.
● जैवविज्ञान, औषधनिर्मिती, भौतिकशास्त्र आदी क्षेत्रांतील अनेक महत्त्वाचे प्रयोग येथे होतात.