इंग्लंडच्या झ्याक क्रॉलीला बाद करून भारताच्या रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 बळींचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय गोलंदाज ठरला. या आधी अनिल कुंबळेने अशी कामगिरी केली होती.
अधिक माहिती
● कसोटीत 500 बळी घेणारा अश्विन जगातील नववा गोलंदाज आणि तिसरा ऑफ- स्पिनर ठरला.
● यापूर्वी, हा टप्पा मुथय्या मुरलीधरन (800), शेन वॉर्न (708), जेम्स अँडरसन (696), अनिल कुंबळे (619), स्टुअर्ट ब्रॉड (604), ग्लेन मॅकग्राथ (563), कोर्टनी वॉल्श (519), नॅथन लायन (517) यांना पार करता आला आहे.
● अश्विनने 500 कसोटी बळींचा टप्पा 98 कसोटींत गाठला.
● हा टप्पा वेगाने गाठणारा तो श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतरचा दुसरा गोलंदाज ठरला .
● मुरलीधरनने 87 कसोटींत हा टप्पा गाठला होता.
● अश्विनने 2011 मध्ये बेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते.
● अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 114, इंग्लंडविरुद्ध 98, विंडीजविरुद्ध 75, न्यूझीलंडविरुद्ध 66, श्रीलंकेविरुद्ध 62, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 57, बांगलादेशविरुद्ध 23 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 5 बळी घेतल्या आहेत.
● अश्विनने भारताबाहेर 153 बळी घेतल्या आहेत.
● अश्विनने वन-डे क्रिकेटमध्ये156, तर आंतरराष्ट्रीय टी-20त 72 बळी घेतल्या आहेत.
● प्रथम श्रेणी सामन्यांत त्याच्या नावावर 741 बळी आहेत.