- ‘आदित्य एल-1’ या यानाने सूर्य आणि पृथ्वीमधील एल-1 बिंदूभोवती पहिली प्रभामंडल कक्षा पूर्ण केली.
- आदित्य एल-1 ला प्रभामंडल कक्षेत ‘एलवन’ बिंदूभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 178 दिवस लागतात.
- प्रभामंडल कक्षेतील प्रवासादरम्यान या यानाला विविध त्रासदायक बलांचा सामना करावा लागेल.
सूर्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा शोधासाठी सात पेलोड्स
- या मोहिमेमागे इस्रोची अनेक उद्दिष्टे आहेत.
- ज्याप्रमाणे पृथ्वीवर भूकंप होतात त्याचप्रमाणे सौर भूकंप देखील होतात, ज्याला कोरोनल मास इजेक्शन म्हणतात.
- सौर कंपनांचा अभ्यास करण्यासाठी सूर्याचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. भारताची पहिली सौर मोहीम ‘आदित्य’ मध्ये सूर्याचा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा शोध घेण्यासाठी सात पेलोड्स आहेत.
- आदित्य एल-1 हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था द्वारे विकसित केले गेलेले अतंराळयान असून दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपित केले आहे.
- सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आणि सौर वायू आणि हवामान याबद्दल माहिती गोळा करण्यासाठी समर्पित आहे.
- हे भारताचे पहिले सौर मिशन आहे.