हिंदी महासागर प्रदेशात वर्चस्व वाढविण्याचा चीनकडून प्रयत्न होत असताना भारतीय नौदलाचेही सामर्थ्य वाढणार आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस इंफाळ’ ही विनाशिका संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत 26 डिसेंबर 2023 रोजी भारतीय नौदलात दाखल होत आहे. विशाखापटनम वर्गातील चार विनाशिकांपैकी ही तिसरी विनाशिका आहे. आयएनएस इंफाळ या विनाशिकेवर ब्राह्मोस क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत.
अधिक माहिती
• ईशान्य भारतातील एखाद्या शहराचे नाव मिळालेली ही पहिलीच युद्धनौका आहे.
• राष्ट्रपतींनी या नावाला एप्रिल 2019 मध्ये मंजुरी दिली होती.
• विनाशिकेला मणिपूरच्या राजधानीचे नाव देण्याचा निर्णय म्हणजे भारताच्या सुरक्षित आणि समृद्धीत ईशान्य भारताचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यासारखे आहे.
• विनाशिकेची संपूर्ण रचना, नौदलाच्या वार्षिक डिझाईन ब्युरो ने केली आहे. त्यानंतर मुंबईतील माझगाव गोदीत तिची बांधणी करण्यात आली.
• आयएनएस इंफाळ ही विनाशिका 20 ऑक्टोबरला नौदलाच्या ताब्यात देण्यात आली होती. त्यानंतर या विनाशिकेच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या. विनाशिकेवरून स्वप्नातीत ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
विनाशिकेची वैशिष्ट्ये
• या विनाशिकेवर अत्याधुनिक क्षेपणास्त्रे तोफा व सेन्सर आहेत.
• पृष्ठभागावरून पृष्ठभागावर तसेच पृष्ठभागावरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र तिच्यावर आहेत.
• विनाशकेवर अत्याधुनिक टेहळणी रडार असून त्याद्वारे विनाशकेवरील तोफखाना विभागाला अचूक मारा करण्याचे मार्गदर्शन होईल.
• शत्रूच्या पाणबुड्याना पाणी पाजण्यासाठी तिच्यावर आधुनिक रॉकेट लॉन्चर, टोपेंडो लाँचर, तसेच पाणबुडीशोधक आणि नाशक हेलिकॉप्टर आहेत.
• शत्रुने रासायनिक, जैविक आणि आण्विक हल्ला केला तर त्याही परिस्थितीत शत्रूवर प्रतिहल्ला चढवण्याची क्षमता या विनाशिकेची आहे.
• शत्रूवर मात करण्यासाठी शत्रूच्या रडारावर न दिसण्याची वैशिष्ट्येही या विनाशिकेवर आहेत.
• वजन : 7400 टन
• लांबी : 164 मीटर