आयडीएफसी फर्स्ट बँक आणि आयडीएफसी लिमिटेड च्या विलीनीकरणाला रिझर्व्ह बँकेने मंजूरी दिली आहे.
एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतरचा या वर्षातील हा दुसरा सर्वात मोठा करार आहे. यापूर्वी भारतीय स्पर्धा आयोगानेही या विलीनीकरणाला मान्यता दिली आहे.
• भारतीय स्पर्धा आयोगानुसार, ‘आयडीएफसी’ च्या 100 शेअरसाठी आयडीएफसी बँकेचे 155 शेअर मिळणार आहेत.
• या विलीकरणाद्वारे, ‘आयडीएफसी’ फर्स्ट बँक,आयडीएफसी लि. आणि आयडीएफसी एफएचसीएल यांचे विलीनीकरण करून एकत्रित एक संस्था तयार करण्यात येणार आहे.
• आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्टचे विलीनीकरण करून 2018 च्या सुरवातीला आयडीएफसी फर्स्ट बँक तयार झाली होती.
दुसरा सर्वात मोठा विलीनीकरण करार
• आयडीएफसी आणि आयडीएफसी बँक विलीनीकरण हा एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणानंतरचा या वर्षातील दुसरा सर्वात मोठा करार आहे.
• बँकेच्या विलीनीकरणासाठी रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय भारतीय स्पर्धा आयोग, एनसीएलटी, बीएसई, एनएसई आणि इतर अनेक नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक आहे.
• या विलीनीकरणाद्वारे, आयडीएफसी फर्स्ट बँक, आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी एफएचसीएल यांचे एका युनिटमध्ये विलीनीकरण केले जात आहे.
• वर्ष 2018 च्या सुरुवातीला आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्टचे विलीनीकरण करून आयडीएफसी फर्स्ट बँक तयार झाली.
• आयडीएफसी लिमिटेडला एप्रिल 2014 मध्ये बँक स्थापन करण्यासाठी आरबीआयने तत्वतः मान्यता दिली होती. त्यामुळे आयडीएफसी बँकेची निर्मिती झाली.
• बँकेने ऑक्टोबर 2015 मध्ये आपले कामकाज सुरू केले. आयडीएफसी बँक आणि कॅपिटल फर्स्टचे 2018 साली विलीनीकरण झाले.
• या विलीनीकरणानंतर नाव बदलून आयडीएफसी फर्स्ट बँक असे करण्यात आले.