- बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
- जागतिक क्रिकेटमधील अत्यंत महत्त्वाच्या पदावर विराजमान होणारे ते सर्वात कमी वयाचे व्यक्ती ठरले आहेत.
- जय शहा हे वयाच्या 36 व्या वर्षी आयसीसीचे अध्यक्ष पद भूषविणार आहेत.
- ग्रेग बारकले यांच्याकडे आयसीसी चे अध्यक्षपद होते पण बारकले हे तिसऱ्यांदा या पदासाठी इच्छुक नव्हते त्यामुळे या पदासाठी जय शहा यांच्या रूपात एकमेव अर्ज आला होता अखेर जय शहा यांची बिनविरोध निवड झाली.
- 2019 या वर्षापासून ते बीसीसीआयचे सचिव म्हणून काम पाहत आहेत.
- आशियाई क्रिकेट संघटनेचे प्रमुखपदही त्यांच्याकडे आहे .
- येणाऱ्या डिसेंबरमध्ये ते आयसीसीच्या अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.
जय शहा आयसीसी चे अध्यक्ष पद भूषवणारे पाचवे भारतीय व्यक्ती..
- आतापर्यंत चार भारतीय व्यक्तींनी आयसीसी चे अध्यक्ष पद भूषवलेले आहे.
- जय शहा हे आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारणारे एकूणच पाचवे व्यक्ती ठरले आहेत.
- सर्वप्रथम जगमोहन दालमिया (1997 ते 2000 )त्यानंतर शरद पवार (2010 ते 2012) एन. श्रीनिवासन (2014 ते 15) आणि शशांक मनोहर (2015 ते 2020) यांनी आयसीसी चे अध्यक्षपद भूषवलेले आहे.
लडाखमध्ये नव्या पाच जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा
- केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
- मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने लडाखमध्ये पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
- गृहमंत्री अमित शाह यांनी या पाच नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीची घोषणा केली आहे.
- या घोषणेनुसार झांस्कार, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग या पाच नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली आहे.
- झांस्कार आणि द्रास हे नवे जिल्हे कारगिल विभागात असतील. तर शाम, नुब्रा आणि चांगथांग हे जिल्हे लेह विभागात आहेत.
- सध्या लडाखमध्ये केवळ लडाख आणि कारगिल हे दोन जिल्हे आहेत.
- केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानंतर आता लडाखधील जिल्ह्यांची संख्या वाढून 7 एवढी झाली आहे.
- लडाख विभागामध्ये अतिरिक्त जिल्ह्यांची मागणी बऱ्याच काळापासून करण्यात येत होती.
- लेह, लडाख आणि कारगिल विभागातील सामाजिक, राजकीय संघटना ह्या नव्या जिल्ह्यांची मागणी वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे केंद्र सरकारने हा महत्त्वपू्र्ण निर्णय घेतला.
- स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच लडाखमधील जिल्ह्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. शासकीय व्यवस्था भक्कम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
आनंद कुमार दक्षिण कोरिया पर्यटनाचे सदिच्छादूत
- सुपर 30′ हा अभिनव शैक्षणिक उपक्रम चालविणारे आनंद – कुमार यांची या वर्षासाठी दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत (अॅम्बेसेडर) म्हणून निवड करण्यात आली.
- त्या देशातील गँगवान या प्रांतात कोरिया टुरिझम ऑर्गनायझेशनच्या (केटीओ) मुख्यालयात नुकत्याच झालेल्या एका समारंभात त्यांना हा बहुमान प्रदान करण्यात आला.
- केटीओच्या आंतरराष्ट्रीय पर्यटन विभागाचे कार्यकारी उपाध्यक्ष हाकजू ली यांच्या हस्ते आनंद कुमार यांनी हा बहुमान स्वीकारला.
- समाजाच्या वंचित गटांतील मुलांच्या कल्याणासाठी काम करणारे आनंद कुमार हे भारत व दक्षिण कोरिया या देशांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे त्यांना दक्षिण कोरियाच्या पर्यटनाचे राजदूत करण्यात आले.
- त्यांच्या या निवडीमुळे भारत व दक्षिण कोरियातील युवकांना एकमेकांची संस्कृती जाणून घेण्याची तसेच देशांच्या विकासास हातभार लावण्याची संधी मिळणार आहे.
बाळाच्या नियमित लसीकरणासाठी ‘हॅलो व्हॅक्सी‘
- बाळांचे लसीकरण करताना अनेकदा गोंधळ उडतो, कधीकधी लसीकरणाची तारीख लक्षात राहत नाही. त्यामुळे राज्य सरकारने लसीकरणाची माहिती मोबाइलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
- त्यासाठी ‘हॅलो व्हॅक्सी‘हे व्हॉट्सअॅप चॅटबॉट सुरू करण्यात आले आहे.
- सध्या हे चॅटबॉट इंग्रजी व हिंदीमध्ये उपलब्ध असून, लवकरच ते मराठीमध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे.
- सार्वजनिक आरोग्य विभाग आणि ‘यूएसएड, मोमेन्टम रूटीन इम्युनायझेशन ट्रान्सफोर्मेशन अँड इक्विटी’ प्रकल्प यांच्या सहकार्याने हे चॅटबॉट तयार करण्यात आले आहे.
- बाळाच्या लसीकरणाशी संबंधित सर्व माहिती देण्यासाठी आणि गैरसमज दूर करण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.
- हे ॲप काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले आहे .त्यावरील माहिती मराठीमध्ये उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे .लवकरच काम पूर्ण होऊन हे ॲप मराठी भाषेमध्ये उपलब्ध होणार आहे.
- ‘हॅलो व्हॅक्सी’ वापरण्यासाठी 8929850850 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर विविध पर्याय उपलब्ध करून दिले जातात.
- त्यातील योग्य तो पर्याय निवडून लसीकरणाविषयी आवश्यक माहिती जाणून घेता येते.
- लसीकरणाविषयी नेहमी विचारले जाणारे प्रश्न, बाळाचे लसीकरण वेळापत्रक, तसेच नकाशाद्वारे जवळील आरोग्य केंद्राची माहिती याद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- त्यामुळे ‘हॅलो व्हॅक्सी’ नागरिकांसाठी 24 तास लसीकरण मित्र बनेल.
मंताय्या बेडके,सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी
- अध्यापनात अभिनव पद्धतींचा वापर करत, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
- या वर्षी (2024) गडचिरोली जिल्ह्यातील मंताय्या बेडके, कोल्हापूर येथील सागर बगाडे राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
- केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 मध्ये पुरस्कारप्राप्त ठरलेल्या येथ शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली.
- त्यानुसार देशभरातील 50 शिक्षक पुरस्कारप्राप्त ठरले आहेत. त्यात राज्यातील दोन शिक्षकांचा समावेश अस आहे.
- शिक्षक दिनी (5 सप्टेंबर) दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणाऱ्या कार्यक्रमात शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
- मंताय्या बेडके गडचिरोली जिल्ह्यातील जाजावंडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत.
- ‘गेली 14 वर्षे संवेदनशील, दुर्गम भागात कार्यरत आहे.
- या काळात शाळेची पटसंख्या 8 वरून 138 पर्यंत वाढवण्यात यश मिळाले आहे.
- ग्रामीण दुर्गम भागात शाळा असूनही लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेत इव्हर्टर, स्मार्ट टीव्ही अशा सुविधा विकसित केल्या आहेत.
- सागर बगाडे कोल्हापूर येथील एस. एम. लोहिया हायस्कूलमध्ये गेली 30 वर्षे चित्रकला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
- निवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.
- ‘विद्यार्थ्यांना घेऊन देशविदेशात कार्यक्रम केले आहेत. दोन विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात योगदान दिले आहे.
- दुर्गम भागातील मुले, शरीरविक्रय करणाऱ्या महिलांची मुले यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले.
- या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याची भावना आहे. हा पुरस्कार त्यांनी मुलांना अर्पण केला .
तोंडावाटे घेण्याची कॉलरा लस तयार
- पटकी अर्थात कॉलरा या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी एकल-स्ट्रेन असलेली आणि तोंडावाटे (ओरल) घेता येणारी लस तयार केल्याची घोषणा ‘भारत बायोटेक’ ने केली.
- या लशीला ‘हिलचोल‘असे नाव देण्यात आले आहे.
- कॉलरा आजाराशी मुकाबला करण्यासाठी ‘भारत बायोटेक’ने हिलमन लॅबोरेटरीजच्या परवान्यांतर्गत हिलचोल (बीबीव्ही131) ही लस तयार केली आहे.
- हिलमन लॅबोरेटरीजला मर्क यूएसए आणि वेलकम ट्रस्ट यांनी निधी पुरवला आहे.
- दर वर्षी कॉलरा प्रतिबंधक ओरल लशीची (ओसीव्ही) मागणी जगभरात वाढत आहे.
- ही मागणी दर वर्षी 10 कोटी मात्रा इतक्या वेगाने वाढताना दिसत आहे.
- या लशीची निर्माती कंपनी एकमेव असल्यामुळे जगभरात कायमच या लशीचा तुटवडा असतो.
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे निधन
- लोकनाट्य, नाटक, चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका अशी चौफेर मुशाफिरी करून आपल्या समर्थ अभिनयाने सात दशके हुकूमत गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचे वयाच्या 81 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
- कला क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्काराच्या त्या मानकरी ठरल्या होत्या.
- त्यांचा जन्म 9 डिसेंबर 1942 रोजी पुणे येथे झाला.
- वयाच्या अकराव्या वर्षी बहुरूपी कला झंकार नृत्य पार्टीच्या मेळ्यामधून त्यांनी नृत्यांगना म्हणून कलेची सुरवात केली.
- ‘बेबंदशाही’ या नाटकामधून त्यांनी रंगमंचावर पहिले पाऊल टाकले.
- ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘रखेली’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, चिरंजीव आईस’, ‘सासूबाईंचं असंच असतं’, ही त्यांची नाटके गाजली.
- त्यांचा रूपेरी पडद्यावरचा प्रवासही थक्क करणारा होता. ‘देवकीनंदन गोपाला’, ‘वारसा लक्ष्मीचा’, ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘पुढचं पाऊल’, ‘आम्ही दोघे राजा-राणी’, ‘आई शप्पथ’, ‘माहेरची साडी’, ‘हिरवा चुडा सुवासिनीचा’, अशा शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटविला होता.
- ‘वक्त के पहले’ आणि ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी स्वतःची छाप सोडली होती.