देशाची आर्थिक राजधानी मुंबईने अब्जाधीशांच्या संख्येत बीजिंगला मागे टाकत जागतिक अव्वल स्थान पटकावले आहे. हुरून रिसर्चनं प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल रिच लिस्ट 2024 नुसार जिथं चीनमध्ये भारतातील 271 अब्जाधीशांच्या तुलनेत 814 अब्जाधीश आहेत तिथं मुंबईत बीजिंगच्या 91 अब्जाधीशांच्या तुलनेत 92 अब्जाधीश आहेत.
अधिक माहिती
• जागतिक क्रमवारीत न्यूयॉर्क 119 अब्जाधीशांसह आघाडीचं शहर असून, त्याखालोखाल 97 अब्जाधीशांसह लंडनचा क्रमांक येतो. तर, मुंबई या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
• देशाची आर्थिक राजधानी अशी ओळख असणाऱ्या मुंबई शहरामध्ये असणाऱ्या अब्जाधीशांच्या एकूण संपत्तीचा आकडा आहे 445 अब्ज डॉलर, म्हणजेच 370,90,3,03,665 रुपये. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 47 टक्क्यांनी वाढला आहे.
• चीनमधील बीजिंग मधील अब्जाधीशांच्या संपत्तीचा एकूण आकडा आहे, 265 अब्ज डॉलर म्हणजेच 220,87,4,84,205 रुपये. चीनच्या शहरातील हा आकडा 28 टक्क्यांनी घटला आहे.
अब्जाधीश शहरांची यादी
हुरुन रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार न्यूयॉर्क अव्वल स्थानावर आहे.
क्र. शहर अब्जाधीशांची संख्या
1 न्यूयॉर्क – 119
2 लंडन – 97
3 मुंबई – 92
4 बीजिंग – 91
5 शांघाय – 87
6 शेनझेन – 84
7 हाँगकाँग – 65