क्षेपणास्त्र सामर्थ्य वाढविण्याच्या व्यापक कार्यक्रमाचा भाग मानल्या जाणाऱ्या उपग्रहाचे इराणने यशस्वी प्रक्षेपण केले.
इराणने ‘सोरया’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले असून, तो पृथ्वीपासून 750 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आला.
अधिक माहिती
● इराणच्या ‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड’च्या अंतराळ मोहिमेचा भाग म्हणून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले असून, त्यावर 50 किलोचे पेलोड्स असल्याचे दूरसंचारमंत्री इसा जरेपौर यांनी सांगितले.
● तेहरानपासून 350 किलोमीटरवरील शाहरौद येथील प्रक्षेपण तळावरून सोडलेल्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची चित्रफीत इराणी माध्यमांनी प्रसारित केली आहे.