इस्रो ची स्पेडेक्स मोहीम यशस्वी
- स्पेसडॉकिंग एक्सपेरिमेंट(स्पेडेक्स) हा अवकाशात दोन उपग्रहांना जोडणारा प्रयोग यशस्वी झाल्याचे भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले.
- जमिनीपासूनसुमारे 475 किलोमीटर उंचीवरील कक्षेत दोन उपग्रहांना एकमेकांशी जोडून भारत स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान अवगत असलेला अमेरिका, रशिया, चीन नंतर जगातील चौथा देश ठरला.
- स्पेडेक्समोहिमेचे ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या (पीएसएलव्ही सी 60) साह्याने 30 डिसेंबरला यशस्वी प्रक्षेपण झाले होते.
- प्राथमिकनियोजनानुसार दोन उपग्रहांना जोडण्याचा प्रयोग सात जानेवारीला करण्याचे निश्चित झाले. मात्र, प्रयोगासाठीची अचूक पूर्वस्थिती गाठता न आल्याने प्रयोग लांबणीवर टाकण्यात आला. अखेर चौथ्या प्रयत्नात 16 जानेवारी रोजी प्रयोग यशस्वी झाल्याचे ‘इस्रो’ ने जाहीर केले.
- इस्रोतीलवरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पुढील काही दिवसांत एका उपग्रहाकडून दुसऱ्या उपग्रहाकडे वीजप्रवाह प्रवाहित करण्याचा प्रयोग केला जाणार असून, त्यानंतर दोन्ही उपग्रहांना विलग करण्यात येईल.
- स्वतंत्रझालेले उपग्रह त्यानंतर वैज्ञानिक उद्दिष्टांसाठी कार्यरत राहतील.
- ‘अमेरिका, रशियाआणि चीन या देशांना डॉकिंगचे तंत्र अवगत असून, ‘स्पेडेक्स’च्या यशामुळे या मानाच्या क्लबमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे. या प्रयोगाकडे साऱ्या देशवासीयांचे लक्ष लागले होते.
- देशाच्याभावी अवकाश योजनांच्या दृष्टीने हा प्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे.
- दोनउपग्रहांना अवकाशात जोडणे आणि विलग करण्याचे तंत्रज्ञान भावी मोहिमांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
- ‘चांद्रयान4’ मोहिमेतून चंद्रावरील दगड, मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात येणार आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या यानांना अवकाशात जोडून पुन्हा विलग करण्याची प्रक्रिया साधावी लागणार आहे.
- सन2028 ते 2035 या काळात भारतीय अवकाश स्थानकाची निर्मितीही टप्याटप्प्याने डॉकिंगद्वारे केली जाईल.
- सन2040 मध्ये चांद्रभूमीवर भारतीय नागरिक पाठवतानाही स्पेस डॉकिंगचा वापर केला जाईल.
अशा प्रकारे मोहीम यशस्वी..
- ‘इस्रो’ने30डिसेंबर रोजी ‘स्पेडेक्स’ मोहिमेला सुरुवात केली.
- पीएसएलव्ही-सी60 मोहिमेमध्ये प्रत्येकी 220 किलो वजनाचे दोन स्पाडेक्स उपग्रह अंतराळात सोडण्यात आले.
- याउपग्रहांना ‘एसडीएक्स-01’ आणि ‘एसडीएक्स-02’ अशी नावे देण्यात आली.
- हेदोन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित झाल्यावर एकमेकांपासून सुमारे 20 किलोमीटर अंतर राखत पृथ्वी प्रदक्षिणा करत होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यामधील अंतर कमी करण्यात आले.
- 16 जानेवारीरोजी दोनही उपग्रहांना जवळ आणण्यात आले आणि त्यांची जोडणी करण्यात आली.
इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे
- 2025 प्रजासत्ताकदिनाच्यासंचलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो उपस्थित राहणार आहेत.
- सुबियांतो25 आणि 26 जानेवारीला भारत दौऱ्यावर असतील.
- अध्यक्षपदीविराजमान झाल्यानंतर ते प्रथमच भारत दौऱ्यावर येत आहेत.
- ‘भारतआणि इंडोनेशियाचे संबंध पूर्वापार सौहार्दाचे संबंध आहेत.
- भारताच्याअॅक्ट ईस्ट धोरणातील आणि आशिया-प्रशांत क्षेत्रातील धोरणातील इंडोनेशिया हा महत्त्वाचा भागीदार आहे.
लोकपाल दिन
- भारताच्यालोकपालाने03.2024 रोजी झालेल्या बैठकीत ठराव केला की कलम 1(4) अन्वये 16.01.2014 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे भारतीय लोकपाल नावाच्या संस्थेच्या स्थापनेमुळे दरवर्षी 16 जानेवारी हा दिवस लोकपाल दिन साजरा केला जाईल.
- श्रीन्यायमूर्ती ए एम खानविलकर यांना03.2024 रोजी भारताच्या लोकपालचे दुसरे अध्यक्ष म्हणून शपथ देण्यात आली. सध्या, मार्च 2024 पासून संस्थेमध्ये अध्यक्ष आणि सहा सदस्य आहेत.
- भारताच्यालोकपालांच्या पहिल्या वर्धापन दिन समारंभाचे 16 जानेवारी रोजी नवी दिल्लीतील माणेकशॉ सेंटर येथे भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आले.
‘न्यू ग्लेन‘ ची यशस्वी चाचणी
- ‘अॅमेझॉन’चेसंस्थापक जेफ बेझोस यांच्या अमेरिकेच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीने 16 जानेवारी रोजी महाकाय प्रक्षेपकाची पहिली यशस्वी चाचणी घेतली.
- प्रक्षेपणानंतरया प्रक्षेपकावरील उपग्रहाचा नमुनाही पृथ्वीच्या कक्षेत सोडला आहे.
- याप्रक्षेपकाच्या आणखी काही चाचण्या होणार असून, त्यानंतर ‘स्पेस एक्स’पाठोपाठ ‘ब्लू ओरिजिन ‘ही उपग्रह प्रक्षेपणाच्या स्पर्धेमध्ये येऊ शकेल.
- ‘न्यूग्लेन’ असे या प्रक्षेपकाला नाव देण्यात आले असून, पृथ्वीची कक्षा पूर्ण करणारे अमेरिकेचे पहिले अंतराळवीर जॉन ग्लेन यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.
- याप्रक्षेपकाची उंची 98 मीटर आहे.
- फ्लोरिडायेथील प्रक्षेपण केंद्रावर 16 जानेवारी रोजी पहाटे ‘न्यू ग्लेन’च्या सर्व सात इंजिन सुरू झाले.
- त्यानंतर13 मिनिटांनी प्रक्षेपक नियोजित ठिकाणी पोहोचले आणि उपग्रहाचा नमुना पृथ्वीच्या कक्षेत सोडला.
- ‘न्यूग्लेन’चे प्रक्षेपण होणार होते; मात्र तांत्रिक अडचणीमुळे प्रक्षेपण लांबणीवर पडले होते. उपग्रह प्रक्षेपण व अंतराळवीरांना अवकाशात नेण्याबरोबरच चांद्रमोहिमेच्या दृष्टीनेही हे प्रक्षेपक विकसित करण्यात आले आहे.
- पहिल्याचप्रयत्नात प्रक्षेपक कक्षेपर्यंत पोचल्याबद्दल ‘स्पेस एक्स’चे एलॉन मस्क यांनी ‘न्यू ओरिजिन’चे अभिनंदन केले.
- बेझोसयांनी 25 वर्षांपूर्वी ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीची स्थापना केली होती.
- 2021पासूनप्रवाशांना अंतराळाची सैर घडवून आणण्याची मोहीम ही कंपनी राबवत आहे.
बालकुमार संमेलनाच्या अध्यक्षपदी वारघडे
- वनराईयूथ फाउंडेशन व अकोला जिल्हा मराठा मंडळ यांच्या वतीने डॉ. धारिया जन्मशताब्दीनिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वनराई बालकुमार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक सुरेशचंद्र वारघडे यांची निवड झाली आहे.
- वन्यप्राणी, पक्षी, झाडे, पर्यावरण, निसर्ग, आदिवासी, हिमयात्रा व चरित्रे, अरण्यकथा इत्यादी विविध विषयांवरील अनेक पुस्तकांचे लेखन वारघडे यांनी केले आहे.
- राज्यसरकारच्या आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीच्या ‘आपले आदर्श गांव’ मासिकाचे ते संपादक आहेत.