Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

इस्रोचे माजी शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे निधन Former ISRO scientist Vijay Pendse passes away

Former ISRO scientist Vijay Pendse passes away

● भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ विजय पेंडसे यांचे अमेरिकेतील सॅन होजे येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले.
● विजय पेंडसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (तत्कालीन पुणे विद्यापीठ) रसायनशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
● त्यानंतर ते पाषाण येथील शस्त्रसंशोधन पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते पाषाण येथील शस्त्रसंशोधन आणि विकास संस्था (एआरडीई) येथे कनिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते.
● त्याच दरम्यान भारताचे रॉकेट मॅन, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी पेंडसे यांची निवड थुंबा विषुववृत्तीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्रावर सहायक शास्त्रज्ञ म्हणून केली. तेथे त्यांना डॉ. वसंत गोवारीकर यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
● भारत सरकारने श्रीहरिकोटा येथे उपग्रह प्रक्षेपण केंद्र उभारण्यासाठी गोवारीकर यांना पाचारण केले. त्यावेळी गोवारीकर यांनी निवड केलेल्या सहकाऱ्यांमध्ये पेंडसे यांचाही समावेश होता.
● त्यांच्यावर अग्निबाणासाठीच्या घन इंधनाच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. हा विभाग स्वतंत्रपणे काम करू लागल्यावर पेंडसे त्याचे प्रमुख बनले.
● भारताच्या एसएलव्ही 3 आणि पीएसएलव्ही प्रक्षेपणात घन इंधनाचा वापर केला गेला.
● 1995 मध्ये अंतर्गत राजकारणाला कंटाळून पेंडसे यांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. ते ‘इस्रो’तून बाहेर पडले.
● कालांतराने अमेरिकेतील मिशिगन येथील एका रासायनिक कंपनीत रसायन विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *