नितेशचे सोनेरी यश
- भारताचाबॅडमिंटनपटू नितेश कुमारने पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत ‘एसएल 3’ वर्गीकरणातील पुरुष एकेरीत सुवर्णपदकावर मोहोर उमटवली.
- यावर्षीच्या स्पर्धेत सोनेरी यश संपादन करणारा तो नेमबाज अवनी लेखरानंतरचा दुसरा भारतीय खेळाडू ठरला.
- हरियाणाच्या29 वर्षीय नितेशने संघर्षपूर्ण झालेल्या अंतिम लढतीत ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा 21-14, 18-21, 23-21 असा पराभव केला.
- पॅरास्पर्धेतील ‘एसएल3’ वर्गीकरणात कमरेखालील अवयव दुर्बल असलेले स्पर्धक भाग घेतात. या प्रकारात अर्ध्या रुंदीच्या कोर्टवर खेळावे लागते.
- वयाच्या15 व्या वर्षी विशाखापट्टणम येथे झालेल्या रेल्वे अपघातात नितेशने आपला डावा पाय गमावला होता.
तुलसी, सुहासला रौप्य
- भारताच्यातुलसीमती मुरुगेशन आणि सुहास यशिराज या पॅरा-बॅडमिंटनपटूंनी रौप्य पदक पटकावले
- ‘एसयू5’ वर्गीकरणातील महिला एकेरीत मनीषा रामदासने डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेनग्रेनचा 21-12, 21-8 असा पराभव करून कांस्यपदक आपल्या नावे केले.
सुमित अंतिलची विक्रमासह सुवर्ण कमाई
- भारताचातारांकित भालाफेकपट्टू सुमित अंतिलने सलग दुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.
- सलगदुसऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा सुमित हा भारताचा दुसरा तर पहिलाच पुरुष खेळाडू ठरला.
- यापूर्वीनेमबाज अवनी लेखराने अशी कामगिरी केली आहे.
- सुमितनेअंतिम फेरीत वर्चस्व गाजवले सुमितने59 मीटर भाला फेकत विक्रम आपल्या नावे लिहिला.
- याआधीटोकियो स्पर्धेत55 मीटरचा भालाफेकीत त्याने विक्रम रचला होता. स्वतःचाच विक्रम त्याने मोडीत काढला
उंच उडीत निशादला रौप्य पदक
- हिमाचलप्रदेशातील उना येथील उंच उडीपटू निषाद कुमारने भारताला ऍथलेटिक्स मधील तिसरे पदक मिळवून दिले.
- 24 वर्षीयनिशादने06 मीटर उडीसह रौप्य पदक पटकावले .
- विशेषम्हणजे टोकियो येथे झालेल्या स्पर्धेतही त्याने रौप्य पदक मिळवले होते.
थाळीफेकीत योगेश कथुनियाचे रौप्य पदक
- पुरुषांच्याएफ 56 वर्गीकरणातील थाळीफेक प्रकारात भारताच्या योगेश कथुनियाने रौप्य पदक पटकावले .
- त्यांनी22 मीटरफेक करताना हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
- योगेशनेटोकियो स्पर्धेतही रौप्य पदक पटकावले होते.
भारत–फ्रान्सचा लष्करी सराव
- भारतव फ्रान्सदरम्यान 2 ते 4 सप्टेंबर दरम्यान भूमध्य समुद्रात ‘एक्झरसाइज वरुण’ हा संयुक्त लष्करी सराव होणार आहे.
- त्यासाठीनौदलाचे ‘पी8आय’ हे विमान फ्रान्समध्ये दाखल झाले.
- यासरावात दोन्ही देशांच्या नौदलांमधील सखोल समन्वय व कार्यक्षमता अधोरेखित करणाऱ्या प्रगत सामारिक डावपेचांचा समावेश असेल.