Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

उपराष्ट्रपती धनखड यांचा राजीनामा Vice President Dhankhar’s resignation

Vice President Dhankhar's resignation

● उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दिला.
● धनखड यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजीनामा पाठवला .
● त्यांनी राज्यघटनेच्या कलम ६७ (अ) अंतर्गत स्वेच्छेने हा निर्णय घेतला आहे.
● ऑगस्ट2022 मध्ये धनखड यांनी पदाची सूत्रे स्वीकारली.
● धनखड यांनी राज्यसभेचे कामकाज चालवताना विरोधकांशी जोरदार संघर्ष केला होता. विरोधकांनी धनखड यांच्याविरुद्ध महाभियोगाचा ठरावही मांडला होता. मात्र, राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी तो फेटाळला होता.
● व्ही. व्ही. गिरी आणि आर. वेंकटरमण यांच्यानंतर राजीनामा देणारे धनखड हे तिसरे उपराष्ट्रपती आहेत.
● धनखड यांचा जन्म 18 मे 1951 रोजी राजस्थानच्या झुणझुणु जिल्ह्यातील किताना गावात झाला.
● त्यांचा राजकीय उदय खऱ्या अर्थाने 2019 नंतर झाला.
● पश्चिम बंगालच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली.
● पश्चिम बंगालमध्ये त्यांनी तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी सातत्याने संघर्ष केला. उपराष्ट्रपतिपदी निवड झाल्यानंतर धनखड यांनी न्यायव्यवस्था आणि कार्यकारी यांच्या अधिकारक्षेत्रावर जोरदार प्रतिपादन केले.
● धनखड यांच्या राजीनाम्याने उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे उपाध्यक्षपद रिक्त झाले आहे.
● नियमानुसार उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक सहा महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. जोवर ही निवडणूक होत नाही, तोवर राज्यसभेचे उपाध्यक्ष त्या पदावरून कामकाज पाहू शकतात.
● राज्यसभेचे सध्याचे उपसभापती हरिवंश एन सिंह आहेत.

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *