‘कहानी घर घर की’, ‘कुटुंब’ सारख्या लोकप्रिय मालिकांमधून नावारूपाला आलेले अभिनेते ऋतुराज सिंग यांचे हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाले. रंगभूमीवरून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या ऋतुराज यांनी दूरचित्रवाहिनी, हिंदी चित्रपट आणि वेबमालिकांमधील चरित्र व्यक्तिरेखांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. काही दिवसांपूर्वी स्वादुपिंडाचा आजार बळावल्यामुळे ऋतुराज यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
अधिक माहिती
● ऋतुराज यांनी गेम शो ‘तोल मोल के बोल’ मधून कारकिर्दीची सुरवात केली होती.
● 1993 मध्ये ‘बनेगी अपनी बात’ या मालिकेमधून त्यांना लोकप्रियता मिळाली.
● त्यांनी ‘ज्योती’, ‘आहट’, ‘अदालत’, ‘हिटलर दीदी’, ‘शपथ’, ‘दिया और बाती हम’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘लाडो- २’ आणि ‘अनुपमा’ अशा अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले.
● ‘लाडो -२’ मधील बलवंत चौधरी ही ऋतुराज यांनी ने साकारलेली भूमिका विशेष लोकप्रिय ठरली.
● ‘बद्रीनाथ की ही दुल्हनिया’ या चित्रपटात त्यांनी केलेली वरुण धवनच्या पित्याची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
● ‘मेड इन हेवन’, ‘क्रिमिनल जस्टिस’, ‘बंदिश बँडिट्स’ अशा वेबमालिकांध्येही त्यांनी काम केले होते.
● रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘इंडियन पोलीस’ या वेबमालिकेतही त्यांची भूमिका होती.