एअरो इंडिया 2025
- आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन असलेल्या एअरो इंडियाच्या 15 व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, 10 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलहंका हवाई दलाच्या तळावर झाले.
- संकल्पना : ‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’
- या व्यापक संकल्पनेवर आधारित, या पाच दिवसांच्या प्रदर्शनात जागतिक एरोस्पेस कंपन्यांच्या अत्याधुनिक उत्पादनांसह भारताचे हवाई सामर्थ्य आणि स्वदेशी अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केले जातील.
- ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनानुसार आयोजित हा कार्यक्रम स्वदेशीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल.



