● कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पियाडमध्ये (आयओएआय) भारताने पहिल्यांदाच सहभाग घेतला अन् उल्लेखनीय यश मिळवले.
● 63 देशांच्या यादीत भारताला तिसरा क्रमांक मिळाला आहे. ‘एआय’च्या आंतरराष्ट्रीय ‘ऑलिम्पियाड’ मध्ये भारताच्या दोन संघांनी भाग घेतला होता.
● अमेरिका आणि चीनच्या संघांना पराभूत करून भारताला तिसरे स्थान मिळाले.
● चीनची राजधानी बीजिंग येथे ‘ऑलिम्पियाड’चे आयोजन करण्यात आले होते.
● भारताने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली.
● रशियाने पहिले तर पोलंडने दुसरे स्थान असून, चीन 11 व्या स्थानी, तर अमेरिका 12 व्या स्थानी राहिला.
● ‘ऑलिम्पियाड’ मध्ये भारताने सहा पदके जिंकली आहेत.
● अर्जुन त्यागी, रौमक दास आणि सौम्या सरकारने सुवर्णपदके जिंकली.
● सामिक गोयल आणि रायन बॅनर्जी हे रौप्यपदक विजेते आहेत.
● हिमांश सोमपल्लेने कांस्यपदक जिंकले.
असे होते स्पर्धेचे स्वरूप ?
● यंदाच्या ‘ऑलिम्पियाड’मध्ये 63 देशांतील 310 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
● ही स्पर्धा मशीन लर्निंग, कॉम्प्युटर व्हिजन, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग आणि रोबोटिक्स यासारख्या विषयांवर आधारित होती.
● विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने होती. भारतीय विद्यार्थ्यांनी या सर्व विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.