● दुर्गम गावांमधील शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या ‘एज्युकेट गर्ल्स’ या स्वयंसेवी संस्थेला 2025 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये स्थान प्राप्त झाले आहे.
● रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारी ही पहिली भारतीय संस्था आहे.
● राजस्थानपासून सुरुवात करून या संस्थेने मुलींच्या शिक्षणाची सर्वाधिक गरज असलेल्या समुदायांची ओळख पटवली.
● शाळाबाह्य किंवा शाळा सोडलेल्या मुलींना पुन्हा वर्गात आणले आणि उच्च शिक्षण आणि रोजगारासाठी पात्रता प्राप्त होईपर्यंत तिथेच ठेवण्यासाठी काम केले.
● मोहिमेचा प्रारंभ 50 दुर्गम गावांपासून झाला असून सध्या 30,000 गावांत संस्था कार्यरत आहे.
● एज्युकेट गर्ल्स ही सफीना हुसेन यांनी 2007 मध्ये स्थापन केलेली एक भारतीय ना-नफा संस्था आहे, जी दुर्गम आणि ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करते.
● ही संस्था शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते आणि समुदायाला एकत्र आणून, नाविन्यपूर्ण विश्लेषणात्मक तंत्रांचा वापर करून, आणि सरकारी शाळांमधील शिक्षण सुधारून शिक्षणाचे ध्येय पूर्ण करते.
● 2025 च्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्यांमध्ये एज्युकेट गर्ल्स (भारत), शाहिना अली (मालदीव) आणि फ्लॅव्हियानो अँटोनियो एल विलानुएवा (फिलिपिन्स) यांचा समावेश आहे.
● एज्युकेट गर्ल्स ही ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल ओळखली जाते, तर शाहिना अली यांनी मालदीवमधील प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या प्रयत्नांसाठी आणि फ्लॅव्हियानो एल विलानुएवा यांनी सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जिंकला आहे.
● 1957 मध्ये फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ या पुरस्काराची स्थापना करण्यात आली. 1958 मध्ये पहिला पुरस्कार देण्यात आला
● उद्दिष्ट:लोकशाही, प्रामाणिकपणा आणि निःस्वार्थ सेवेचा गौरव करणे.
● क्षेत्र:सरकारी सेवा, समाजकारण, साहित्य, पत्रकारिता, शांतता आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना हा पुरस्कार दिला जातो