● सुलेमान उर्फ आसिफ हा २२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय असून, पॅरा कमांडोंनी केलेल्या कारवाईत त्याच्यासह त्याचे दोन साथीदारही मारले गेले.
सैन्याचे ऑपरेशन महादेव
● दहशतवाद्यांची मुळे उखडण्यासाठी सैन्याने एक दीर्घ रणनीती आखली. ज्याला ऑपरेशन महादेव असे नाव देण्यात आले.
● ही कारवाई 96 दिवस चालली आणि त्याचा उद्देश पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना पकडणे किंवा मारणे हा होता.
● ऑपरेशन महादेवचा टप्पा 28 जुलै 2025 रोजी श्रीनगरच्या दाचीगाम भागात झालेल्या चकमकीने सुरू झाला.
● त्यात स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG) आणि भारतीय सैन्याच्या 12 शीख लाईट इन्फंट्रीचा समावेश होता.
उद्दिष्ट
● याचे उदिष्ट दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करणे आणि मुख्य हल्लेखोरांना शोधणे, हे होते.
● सैन्याने ड्रोन आणि ह्युमिंट (मानवी बुद्धिमत्ता) वापरून दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधला.
● दचीगामच्या जंगलात जिथे ते लपले होते. तेथे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली. २८ जुलै रोजी सकाळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला.
● दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. परंतु लष्कराने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. ही चकमक 6 तास चालली. ज्यामध्ये तीन दहशतवादी मारले गेले.