- लोकसभा निवडणुकीबरोबरच झालेल्या ओडिशा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नवीन पटनाईक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दलाची 24 वर्षांची सत्ता खालसा करून राज्यात सत्तांतर घडवले.
ओडिशा विधानसभा निकाल:
- एकूण जागा : 141
- भाजप: 79
- बीजेडी : 50
- काँग्रेस : 14
- माकप : 1
- अपक्ष: 3
आंध्रात टीडीपी चे वर्चस्व
- पाच वर्षांपूर्वी प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या ‘वायएसआर’ काँग्रेसला धक्का देऊन तेलगू देसम पक्ष (टीडीपी), जनसेना पक्ष आणि भाजप या ‘एनडीए’ आघाडीने आंध्र प्रदेशात सत्तांतर घडवले.
- राज्याच्या 175 जागांच्या विधानसभेत या आघाडीने दीडशेपार वाटचाल केली.
- आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत ‘एनडीए’ने 164 जागांवर विजय मिळवला.
- माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाने 135 जागा जिंकल्या.
- जनसेनेला 21 जागा मिळाल्या असून, भाजपने 8 जागा जिंकल्या आहेत.
आंध्र विधानसभा निकाल
- एकूण जागा : 175
- तेलगू देसम : 135
- जनसेना पक्ष : 21
- भाजप : 8
- वायएसआर : 11