Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

ओपल सुचाता 2025 ची मिस वर्ल्ड Opal Suchata is Miss World 2025

  • Home
  • June 2025
  • ओपल सुचाता 2025 ची मिस वर्ल्ड Opal Suchata is Miss World 2025
Opal Suchata is Miss World 2025

● हैदराबाद येथे आयोजित केलेल्या ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेत थायलंडच्या ओपल सुचाता चुआंगस्री हिने बाजी मारली.
● 108 देशांच्या सौंदर्यवतींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.
● भारताच्या नंदिनी गुप्ता हिला ‘अव्वल 8’मध्ये येण्यात अपयश आले.
● ‘मिस वर्ल्ड’चा मुकूट परिधान केल्यानंतर ओपल सुचाताने ‘नमस्ते’ म्हणत उपस्थितांना अभिवादन केले.
● थायलंडमधील ती पहिली महिला आहे जी मिस वर्ल्डचा किताब जिंकली आहे.
● तिला 1 दशलक्ष डॉलर्स (8.3 कोटी रुपये) बक्षीस मिळाले.
● मिस वर्ल्ड 2025’ मध्ये इथिओपियाची हॅसेट डेरेजे अदमासूने दुसरा, तर पोलंडची मेय क्लाजदाने तिसरा क्रमांक मिळवला आहे.
● ओपल सुचाताचा जन्म : 20 सप्टेंबर 2003, फुकेट, थायलंड
● ओपल सुचाताने स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृतीसाठी सामाजिक कार्य केले आहे.
● थायलंडच्या प्रतिष्ठित थम्मासात विद्यापीठात आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यास करत आहे. ती थाई, इंग्रजी आणि चिनी भाषांमध्ये प्रवीण आहे.
● ओपलने यापूर्वी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. तिने मेक्सिको सिटीमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मिस युनिव्हर्स 2024 मध्ये भाग घेतला होता.
● त्यामध्ये ती तिसरी उपविजेती होती. यानंतर तिने मिस वर्ल्ड थायलंड 2025 चा मुकुटही जिंकला होता. आता मिस वर्ल्ड मुकुटावर तिने आपलं नाव कोरलं आहे.
● 72वी मिस वर्ल्ड स्पर्धा 7 मे 2025 ते 31 मे 2025 दरम्यान भारतात(हैद्राबाद) पार पडली.
● अंतिम सोहळा हैदराबादच्या HITEX कन्व्हेन्शन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आला.
● या स्पर्धेत 108 देशांनी भाग घेतला, 40 देशांच्या स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.
● हैदराबादमध्ये झालेल्या 72 व्या मिस वर्ल्डच्या जज पॅनेलमध्ये अभिनेता सोनू सूदचा समावेश होता. त्याला मिस वर्ल्ड ह्युमॅनिटेरियन पुरस्कार मिळाला आहे.
● स्पर्धेचे सह-आयोजक म्हणून २०१६ ची मिस वर्ल्ड स्टेफनी डेल व्हॅले आणि सचिन कुंभार होते . या आवृत्तीत बॉलिवूड कलाकार जॅकलिन फर्नांडिस आणि ईशान खट्टर यांनी सादरीकरण केले.
● मागील वर्षाची विजेती – क्रिस्टीना पिजाकोवा

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *