पंतप्रधानपदाची धुरा थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे देण्याची घोषणा ‘कंबोडिया पीपल्स पार्टीचे’ नेते हुन सेन यांनी केली . कंबोडियन पीपल्स पार्टीने सार्वत्रिक निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर हुन सेन यांनी ही घोषणा केली. हुन सेन यांचे कंबोडियावर 38 वर्षांपासून निरंकू सत्ता आहे . यावर्षी निवडणुकांपूर्वी त्यांनी थोरला मुलगा हुन मानेट याच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा सोपवणार असल्याची घोषणा केली होती. हुन मानेट सध्या कंबोडियाचे लष्कर प्रमुख आहेत. त्यांनी यावेळेस झालेल्या निवडणुकीत प्रथमच विजय मिळवला आहे.


