Shopping cart

Shopping cart

Subtotal 0.00

View cartCheckout

shape
shape

‘कलम – 6 अ’ वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

'कलम - 6 अ' वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

कलम – 6 वैध: सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

  • नागरिकत्व कायद्यातील ‘कलम- 6 अ’च्या घटनात्मक वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने बहुमताने शिक्कामोर्तब केले.
  • याकलमान्वये 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 दरम्यान भारतात आलेल्या स्थलांतरितांच्या भारतीय नागरिकत्वाला मान्यता देण्यात आली आहे.
  • सरन्यायाधीशधनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने हे आदेश दिले.
  • बेकायदास्थलांतरितांच्या समस्येवर राजकीय मार्गाने तोडगा काढण्यासाठी याबाबतचा आसाम करार अस्तित्वात आला होता, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
  • याकायद्यातील ‘कलम 6 अ’ हे 1985 सालच्या आसाम करारानुसार आणण्यात आले होते.
  • याकलमानुसार 1966पूर्वी भारतात आलेल्या बांगलादेशी लोकांचे नागरिकत्व कायम राहणार आहे तर 1966 ते 1971 दरम्यान आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्वासाठी अर्ज करावे लागतील.
  • सरन्यायाधीशधनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला, न्या. मनोज मिश्रा, न्या. एम. एम. सुंद्रेश आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर डिसेंबर २०२३ मध्ये सदर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती.त्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
  • न्यायालयाच्यापाच सदस्य खंडपीठाने चार विरुद्ध एक मतांनी ही तरतूद उचलून धरली.
  • न्या. एम. एम. सुंदरेश, न्या. मनोजमिश्रा तसेच न्या. सूर्यकांत यांनी सरन्यायाधीशांना सहमती दर्शवली. तर न्या. जे. बी. पारडीवाला यांनी मात्र ‘6अ’ विभाग वैध नसल्याचे मत नोंदविले.

6  विभाग 

  • नागरिकत्वकायद्याच्या विभाग ‘6 अ’ अंतर्गत आसाममध्ये 1 जानेवारी 1966 ते 25 मार्च 1971 पर्यंत आलेल्या बेकायदा स्थलांतरितांना, विशेषतः बांगलादेशमधून आलेल्यांना, नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.
  • राजीवगांधी पंतप्रधान असताना केंद्र सरकार आणि ऑल आसाम स्टुडंट्स युनियन (आसू) यांच्यामध्ये ‘आसाम करार’ झाला होता. त्यानंतर 1985 मध्ये ही तरतूद लागू करण्यात आली.
  • त्यानंतर25 मार्च 1971 ही बांगलादेशातून आसाममध्ये आलेल्या स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची तारीख निश्चित झाली.

नायबसिंह सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री

  • हरियाणाचेनवे मुख्यमंत्री म्हणून नायबसिंह सैनी यांनी  शपथ घेतली.
  • पंचकुलायेथे झालेल्या या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.
  • राज्यपालबंडारु दत्तात्रय यांनी सैनी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.
  • सैनीयांची राजकीय कारकीर्द ही साधारणपणे तीस वर्षांची आहे.
  • माजीमुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखालीच त्यांचे राजकीय नेतृत्व घडले.
  • ते2014 मध्ये सर्वप्रथम नारायणगड मतदारसंघाचे आमदार बनले .
  • कुरूक्षेत्रमतदारसंघातून खासदार बनल्यानंतर त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय उदय झाला.
  • काँग्रेसचेउमेदवार निर्मलसिंह यांचा त्यांनी प्रचंड मताधिक्क्याने पराभव केल्यानंतर त्यांचे नेतृत्व हे राष्ट्रीय पातळीवर पोचले.

निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024′चा किताब पटकावला

  • मध्यप्रदेशमधीलउज्जैन इथल्या निकिता पोरवालने ‘फेमिना मिस इंडिया 2024’चा किताब पटकावला आहे. तीस स्पर्धकांना मात देत तिने स्वत:ला सिद्ध केलं आहे.
  • मुंबईतया प्रतिष्ठित सौंदर्यस्पर्धेचा ग्रँड फिनाले पार पडला.
  • मध्यप्रदेशमधल्याउज्जैन इथल्या निकिताने टीव्ही अँकर म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती अभिनय आणि रंगभूमीकडे वळली.
  • आतापर्यंतनिकिताने 60 हून अधिक नाटकांमध्ये काम केलंय. इतकंच नव्हे तर तिने ‘कृष्ण लीला’ हे 250 पानी नाटकसुद्धा लिहिलं आहे.
  • तिनेएका चित्रपटातही काम केलं असून तो चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. निकिताचा चित्रपट लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे.
  • ग्रँडफिनालेमध्ये गतवर्षीची विजेती नंदिनी गुप्ताकडून निकिताला ‘फेमिना मिस इंडिया’चा मुकूट घालण्यात आला तर अभिनेत्री नेहा धुपियाने तिला ‘मिस इंडिया’चा सॅश घातला.
  • यासौंदर्यस्पर्धेत दादरा नगर हवेली ची  रेखा पांडे दुसऱ्या क्रमांकावर राहिली आणि गुजरातच्या आयुषी ढोलकियाने तिसरे स्थान पटका ले.
  • फेमिनामिस इंडिया 2024 ही फेमिना मिस इंडिया स्पर्धेची 60 वी आवृत्ती होती , ज्याचा हीरक महोत्सव 16 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये केंद्रशासित प्रदेशांच्या एकत्रित प्रतिनिधीसह दिल्लीसह सर्व 29 राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे 30 स्पर्धक होते .

Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *